Thursday 17 July 2014

अधिस्वीकृतीधारक पत्रकारांची यादी नसल्याने बस पास नाहीत

राज्य शासनाच्या अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना मुंबई मध्ये बेस्ट बसचे पास देण्याची योजना बेस्ट प्रशासनाने मंजूर केली आहे. तसे पत्र बेस्ट प्रशासनाने संचालक माहिती व जनसंपर्क मंत्रालयाकडे पाठवले असून मंत्रालयातील अधिस्वीकृतीधारक पत्रकारांची यादी मागविली आहे. परंतू माहिती व जनसंपर्क विभागाच्या संचालकांनी अशी यादी बेस्टकडे पाठवली नसल्याने बहुतेक अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना बस पासच्या सुविधेपासून वंचित राहावे लागले आहे.

मुंबई महानगर पालिका आणि बेस्टचे वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकाराप्रमाणे बेस्ट प्रवासाचा पास अधिस्वीकृतीधारक पत्रकारांन देण्यास बेस्ट प्रशासनाने मंजूर केले. योजनेची सुरुवात म्हणून पालिका व बेस्ट मध्ये असलेल्या सत्तधारी शिवसेनेच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी काही मोजक्या चमकेश पत्रकारांना पास वितरीत करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांना पास मिळत नसल्याचे लक्षात येताच पत्रकारांनी याचा पाठपुरावा केला असता बेस्टने अधिस्वीकृतीधारक पत्रकारांची यादी मागवून सुद्धा संचालक माहिती व जनसंपर्क हे अशी यादी देत नसल्याने पत्रकारांना बस पास मिळण्यात अडचणी येत आहेत.

एकीकडे काही विधिमंडळ मंत्रालय वार्ताहर संघाच्या चमकेश पत्रकारांना बसपास मिळाल्यावर आपल्या सारख्या इतर पत्रकारांना बस पास मिळावा म्हणून मदत आणि पाठपुरावा करायचा सोडून वार्ताहर संघाच्या या चमकेश पत्रकारांनी आमच्या वार्ताहर संघाचे पत्र  दिल्याशिवाय कोणालाही बस पास दिले जाणार नाही असे सांगून गैरसमज पसरवण्याचे काम केले आहे. वास्तविक पाहता इतर पत्रकारांच्या बजेटच्या ब्यागा पळवणाऱ्या आणि दिवाळीला पाकीटे गोळा करणाऱ्या पत्रकारांचा विधिमंडळ मंत्रालय वार्ताहर संघ हा नोंदणीकृत नसल्याने याला काडीची किंमत नाही.

परंतू आपल्याला भेटले आता इतरांना भेटू नये अश्या संकुचित वृत्तीच्या असलेल्या पत्रकारांमुळे इतर पत्रकारांना पास मिळालेले नाहीत. आपल्या प्रमाणे इतर पत्रकारांना पास मिळावे म्हणून एकाही वार्ताहर संघाच्या पदाधिकाऱ्याने बेस्ट किवा संचालकाकडे पाठपुरावा केलेला नाही. आज असा पाठपुरावा झाला असता तर सर्वच अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना बस पास मिळाले असते. परंतू नेमके हेच नको असल्याने असा पाठपुरावा करण्यात आलेला नाही. वार्ताहर संघाच्या पदाधिकारी म्हणवणाऱ्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे असल्याचे सर्व पत्रकारांना दिसले असल्याने अश्या नालायक पत्रकारांचा निषेध केला जात आहे.