Friday 15 August 2014

लाचखोर पोलीस व पत्रकार गजाआड

मुंबई मधील मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक फुलसिंग पवार यांचे कार्यालयीन मदतनीस, पोलीस शिपाई उमेश जोशी व पत्रकार सिद्धार्थ धाडवे यांना लाचलुचलप प्रतिबंधक विभागा(एसीबी) ने ४ हजारांची लाच स्वीकारल्या प्रकरणी अटक केली आहे. धाडवे राज्यातील एका प्रमुख वृत्तवाहिनीचे अंशकालीन वार्ताहर आहेत. जोशी यांच्या सांगण्यावरून त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारताना रचलेल्या सापळ्यात धाडवे रंगेहाथ पकडले गेले. मात्र धाडवे यांचा या गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग आहे का याचा तपास एसीबी करत आहे.

मिळालेल्या माहिती नुसार फिर्यादी अभिलेखावरील असल्याने सणासुदीचा, निवडणुकीच्या काळात मुलुंड पोलीस प्रतिबंधात्मक कारवाईसाठी त्याला नोटीस धाडून कारवाई करतात. या रोजच्या जाचातून सुटका होण्यासाठी फिर्यादी दरमहा ४ हजार रुपयांचा हफ्ता जोशी या पोलिस शिपायाला देत असे. मात्र असे असूनही काही दिवसांपूर्वी पोलिसांनी फिर्यादीला नोटीस धाडली. पैसे देऊनही नोटीस कशी आली, हे जाणून घेण्यासाठी फिर्यादीने जोशीला ४ हजार घेऊन पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने एसीबीकडे तक्रार दिली. यावेळी एसीबीने सापळा रचून पत्रकार सिद्धार्थ धाडवे व पोलीस शिपाई उमेश जोशी यांना पकडले आहे.