Saturday 2 August 2014

इजराइल फिलीस्तीन मध्ये पत्रकारांना टार्गेट करून मारत आहे – जेयूसीएस

इजराइल फिलीस्तीन में पत्रकारों की कर रहा है ‘टारगेट किलिंग’ –जेयूसीएस

लखनऊ : जर्नलिस्ट यूनियन फॉर सिविल सोसाइटी (जेयूसीएस) द्वारे इजराइली सेने द्वारे मारल्या गेलेल्या पत्रकार रामी रॉयन, अहद जकाउत, खालिद हमाद, नजला महमूद हज, अब्दुरहमान जियाद अबु हिन, इज्जत दुहैर, बहाउद्दीन गरीब यांच्या पत्रकारितेला सलाम करत श्रद्धांजली वाहिली. तसेच इजराइली वस्तूंवर बहिष्कार घालावा असे आवाहन केले आहे.

इजराइलने वृत्तसंकलन करणाऱ्या सात पत्रकारांना मारून युद्ध नियमांचे उल्लंघन केले आहे. इजराइल आंतरराष्ट्रीय नियम आणि कायद्यांची पायमल्ली करत आहे. ७ मृत पत्रकारांमध्ये रामी रॉयन सारख्या फोटो जर्नलिस्टचा समावेश आहे. यामुळे इजराइल पत्रकारानाही टार्गेट करून मारून टाकत आहे. यामुळे जगातील सर्व पत्रकार युद्ध अपराधी इजराइलच्या साम्राज्यवादी विचारधारेला उध्वस्त करतील असे जेयूसीएसने म्हटले आहे.

इजराइल हा एक युद्ध अपराधी देश असून तो फक्त आपल्या लाभासाठी मानवी सभ्यतेचा अंत करत आहे. संपूर्ण जगामध्ये इजराइल देशातील कंपन्याद्वारे नफा कमवत असून हा पैसा लोकांची हिंसा करण्यासाठी वापरत आहे. यामुळे इजराइल मध्ये बनलेल्या वस्तूंवर सर्वांनी बहिष्कार घालावा असे आवाहन जेयूसीएसने केलें आहे.