Tuesday 5 August 2014

कर्नाटक पोलिसांची पत्रकारांनाही धमकी

कर्नाटक मध्ये मराठी भाषिकांवर पोलिसांनी केलेल्या अत्याचारामुळे कर्नाटक पोलिस आणि तेथील सरकारच्या विरोधात संताप पसरला आहे. कर्नाटक मधील मराठी भाषिकांना पाठींबा व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात आंदोलन केली जात असून कित्तेक ठिकाणी बंद पाळला गेला आहे. कर्नाटक मधील मराठी भाषिक जनतेच्या व नेत्यांच्या मुलखाती घेण्यासाठी, तसेच त्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी "मी मराठी" या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक रवींद्र आंबेकर व सुरेश ठमके हे पत्रकार गेले असता त्यांना मुलखाती घेण्यापासून कर्नाटक पोलिसांनी रोखले. तसेच त्यांना कर्नाटक सोडून जा नाहीतर अटक करू अशी धमकी दिली आहे. कर्नाटक सरकार आणि पोलिस पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करत असल्याने या प्रकाराचा सर्वत्र तीव्र निषेध केला जात आहे. घडल्या प्रकारामुळे महाराष्ट्रातील पत्रकारांमध्ये तीव्र संताप पसरला असून कर्नाटक सरकार आणि पोलिसांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आला आहे.