Wednesday 27 August 2014

रांची, रीस्म येथे पत्रकारांवर हल्ला - एक जखमी

रांची - येथील रीस्म परीसात मंगळवारी रात्री उशिरा जुनिअर चिकित्सकांनी वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांवर हल्ला केला. पत्रकारांवर हल्ला करण्यात आल्याने बरीयातू पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनोद कुमार पत्रकारांना वाचवण्यासाठी पुढे आले असता त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये दैनिक "हिंदुस्तान टाइम्सचे" पत्रकार दीपक महतो यांच्या डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलिस अधीक्षक अनुप बीरथरे पोहोचले असता त्यांच्याशीही बाचाबाची करून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

याबाबत अधिक माहिती अशी कि, रीस्म येथे मेडिकलच्या विद्यार्थ्यांकडून उपोषण करण्यात येत आहे. उपोषणकर्त्याची तब्बेत बिघडल्याची माहिती मिळाल्याने "टेलिग्राफ" च्या विशेष प्रतिनिधी चंद्रोशी वृत्तसंकलन करण्यासाठी गेल्या असता त्यांची छेड काढून त्यांना मारहाण करण्यात आली. याबाबत चंद्रोशी यांनी डॉ. उमेश कुमार व डॉ. जितेन्द्र सिंह यांच्यासह अन्य तीन लोकांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. याप्रकरणी रात्री रीस्मचे विद्यार्थी संचालकांना घेवून पोलिस ठाण्यात गेले होते. यावेळी वातावरण तणावपूर्ण झाले आणि विद्यार्थ्यांनी पत्रकारांवर पुन्हा हल्ला केला.