Monday 13 October 2014

उमेदवारांनी पत्रकारांना खुश केले - " पेड न्यूज " रेट

महाराष्ट्रात सध्या विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. निवडणुका जाहीर झाल्या असल्याने " पेड न्यूज " वर बंदी घालण्यात आली आहे. " पेड न्यूज " वर बंदी असली तरी कायदा धाब्यावर बसवत पत्रकार, वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यानी आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. निवडणूकीसाठी उमेदवारांनी अर्ज भरल्यापासून वृत्तपत्रातून ( काही अपवाद वगळता ) जाहिरातीच्या दराप्रमाणे पेड न्यूज प्रसिध्द केल्या जात आहेत. वृत्तवाहिन्यांच्या ( काही अपवाद वगळता ) प्रतिनिधींनी दीड ते १५ लाखाचे प्याकेज घेवून उमेदवारांची प्रसिद्धी केली आहे. विशेष म्हणजे काही वृत्तपत्रांनी आम्ही पेड न्यूज घेत नाही अश्या जाहिराती प्रसिद्ध केल्या असल्या तरी मोठ्या प्रमाणात पेड न्यूज प्रसिद्ध केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पत्रकार आपल्या वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांसाठी पेड न्यूजचे प्याकेज घेण्यात व्यस्त असताना भुरट्या पत्रकारांनीही उमेदवारांकडून बक्कळ पैसा कमवला आहे. तुमची बातमी, फोटो फलाना फलाना पेपरला छापून आणतो, तुमची बातमी या च्यानेल वर दाखवायला सांगतो असे सांगून कित्तेक उमेदवारांना लाखो रुपयांचा चुना लावला आहे. एकीकडे फसवा फसवी करून पैश्यांची कमाई केली जात असताना दुसरीकडे ब्ल्याकमेलिंग सुद्धा करण्याचे प्रकार घडले आहेत. काही पेड न्यूज घेणाऱ्या पत्रकारांनी विरोधी उमेदवारांकडून तुमच्या विरोधात आमच्या वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध होणार नाहीत याची काळजी घेवू असे सांगून हजारो रुपये वसूल केले आहेत. निवडणूक असल्याने उमेदवारांनी खरा असो व भुरटा, बातम्या छापणारा असो वा बातम्या दाबणारा सर्वच पत्रकारांना खुश केले आहे.

मुंबईमधील "पेड न्यूज" चे रेट 
पाप नगरी, थुंबई चौफेर, तुमचा वार्ताहर, अपयश भूमी ४ पेपरचे एकत्र १३ लाख ( १० दिवसाचे प्याकेज )
जुनाकाळ ६ लाख ( १० दिवसाचे प्याकेज ) ( एक बातमी ६० हजार रुपये )
ठोकमत ५ लाख ( १० दिवसाचे प्याकेज ) ( प्रत्येक प्रतिनिधीला ५० लाखाचे टार्गेट )
रुढारी २ ते ५ लाख ( १० दिवसाचे प्याकेज )
सुकाळ  ५ लाख लाख कमीत कमी २ लाख ( १० दिवसाचे प्याकेज )
मुत्त मानस ३ ते ६ लाख ( १० दिवसाचे प्याकेज )
तुम्हारा महानगर ६ ते ८ लाख ( १० दिवसाचे प्याकेज )
जुना भारत २ ते ४ लाख ( १० दिवसाचे प्याकेज )

इतर छोटी वृत्तपत्रे
टयाबोलाईड एका बातमीचे ३ ते १० हजार
ब्रोडशीट एका बातमीचे ६ ते १५ हजार