Saturday 11 October 2014

आर्थिक सेटिंगमुळे वृत्तवाहिन्यांच्या सर्वेक्षणात भाजपाला बहुमत ?

नरेंद्र मोदी यांना भारताच्या पंतप्रधान पदावर बसवण्यात वृत्तवाहिन्या आणि सोशल मिडियाचा मोठा हात आहे. केंद्रात सरकार स्थापन केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. त्यासाठी भाजपाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील असे सर्वेक्षणात दाखवण्यासाठी भाजपाने काही वृत्तवाहिन्यांबरोबर आर्थिक सेटिंग केली आहे. या सेटिंग मध्ये कोणत्या वृत्तवाहिन्यांना किती रक्कम मिळाली याची जोरदार चर्चा सध्या पत्रकारांमध्ये आहे.

महायुती तुटल्या नंतर भाजपाला काहीही करून महाराष्ट्रातील सत्ता मिळवायची आहे. त्यासाठी सत्ताधाऱ्यांवर आरोप करणारी "कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा" हि जाहिरात भाजपाने बनवली. परंतू या जाहिरातीचा फायदा होण्या ऐवजी भाजपा विरोधात या जाहिरातीमुळे संतापाची लाट उसळली. युवकांनी आणि सोशल मिडिया वरून या जाहिरातीचे धिंडवडे काढले. मतदारांमध्ये निर्माण झालेल्या संतापामुळे व झालेल्या टीकेमुळे हि जाहिरात बंद करण्याची नामुष्की भाजपावर आली आहे. मोदींनीही महाराष्ट्रात कोणताही लायक नेता नसल्याने माझ्यावर प्रचार करायची वेळ आली आहे असे वक्तव्य करून महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांची अब्रू धुळीस मिळवली आहे. यासर्व कारणाने निवडणूक जाहीर झाल्यावर प्रचारामध्ये पुढे असलेला भाजपा सध्या ब्याकफुटवर गेला आहे. 

यामुळे मतदारांना भाजपाचे जास्त उमेदवार निवडून येतील असे सर्वेक्षणातून दाखवण्यात येत आहे. असे सर्वेक्षणात दाखवल्यास आपोआप मतदार आपले मत फुकट जाऊ नये म्हणून भाजपा उमेदवारांना मत देतील हे या मागचे कारण आहे. असे मतदारांवर प्रभाव टाकणारे सर्वेक्षण दाखवून मतदारांची दिशाभूल करण्यासाठी भाजपा आणि काही वृत्तवाहिन्यांची आर्थिक सेटिंग झाली असल्याची चर्चा आहे. पत्रकारांमध्ये सध्या काही वृत्त वाहिन्यांची नावे चर्चेत असून कोणी किती करोड घेतले याची चर्चा खुले आम होत आहे. वृत्तवाहिन्यांनाकडून असा प्रकार केला असल्यास हि निषेधार्य बाब आहे. अशी सेटिंग झाली असल्यास याची निवडणूक आयोगाने दखल घेवून चौकशी करण्याची गरज असताना निवडणूक आयोग मात्र डोळ्यावर पट्टी लावून बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. यामुळे निवडणूक आयोगाने याची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणण्याची गरज आहे.