Thursday 23 October 2014

‘वॉशिंग्टन पोस्ट’चे माजी संपादक ब्रॅडली यांचे निधन

वॉशिंग्टन पोस्टचे माजी संपादक बेंजामिन ब्रॅडली (९३) यांचे मंगळवारी निधन झाले. जगभरात गाजलेले वॉटरगेट प्रकरण उघड करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. वॉशिंग्टन पोस्ट हे वर्तमान जागतिक दर्जाचे करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. अमेरिकेचे राजकारण हादरवणारे वॉटरगेट प्रकरण त्यांच्याच संपादकपदाच्या कारकिर्दीत घडले होते. 

अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतरच वॉशिंग्टन पोस्टने आपली याबाबतची मालिका थांबवली होती. हे प्रकरण उघडकीस आणणारे पत्रकार बॉब वुडवर्ड यांना त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला होता. त्यांच्या निधनाबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी शोक व्यक्त केला आहे. ‘खरा पत्रकार’या शब्दात ओबामा यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.