Monday 17 November 2014

आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धा 2014

दिवाळी अंक ही महाराष्ट्राची एक सांस्कृतिक परंपरा असून ती अखंडपणे चालू रहावी व त्यातून दर्जेदार साहित्याची निर्मिती व्हावी या उद्देशाने जयसिंगपूर येथील आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना दरवर्षी दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करते, त्यात उत्कृष्ट दिवाळी अंकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येते. याही वर्षी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 

या स्पर्धेत उत्कृष्ट संपादन, उत्कृष्ट मांडणी, उत्कृष्ट छपाई, खास मुलांसाठी प्रसिद्ध होणारे दिवाळी अंक, विनोदी साहित्य, उत्कृष्ट कादंबरी, उत्कृष्ट कथा, उत्कृष्ट लेख, उत्कृष्ट मुलाखत, उत्कृष्ट कविता, हास्यचित्रे, ई दिवाळी अंक, सामाजिक दिवाळी अंक, ध्वनीफिती, ध्वनीचित्रफिती, ब्रेललिपी, अनियतकालिक, शिक्षण विषयक, समाज प्रबोधन आणि उत्कृष्ट मुखपृष्ट अशा 25 प्रकारामध्ये 25 पुरस्कार स्मृती चिन्हाच्या स्वरुपात देण्यात येतील. साहित्य जगतात आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेचा पुरस्कार मानाचा समाजला जातो. 

स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवेश फी नसून या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणा-यानी आपल्या दिवाळी अंकाच्या सहा (6) प्रती नोंदणीकृत टपाल किंवा कुरिअर मार्फत या संस्थेकडे दिनांक 31 डिसेंबर 2014 पर्यंत किवा तत्पूर्वी पोहोचतील अशा बेताने डॉ. सुनिल पाटील, कार्यकारी संचालक - आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना, सुदर्शन पॅलेस, प्लॉट # 16, पद्मावती सोसायटी, बायपास रोड, नांदणी नाक्याजवळ, माय स्कूलच्या पाठिमागे, जयसिंगपूर - 416101, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र sunildadapatil@gmail.comsunil77p@rediffmail.com, या पत्यावर पाठवाव्यात किवा 02322 - 225500, 09975873569 या क्रमांकावर संपर्क साधावा.