Thursday 27 November 2014

हिसार लाठीहल्ल्यातील जखमी पत्रकार नुकसान भरपाईसाठी सर्वोच्च न्यायालयात


नवी दिल्ली - हरयाणा हिसार येथील सतलोक आश्रामामधून तथाकथित बाबा रामपाल याला पोलिसांकडून अटक करतानाचे वृत्तसंकलन करणारे पत्रकार विकास चंद्र यांची प्रकृती खालावली आहे. याच घटनेमध्ये जखमी झालेल्या इतर ४ पत्रकारांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करून पत्रकारांना झालेल्या मारहाणीची आणि जखमी पत्रकारांना नुकसान भरपाई देण्याची मागणी मागणी केली आहे. 

सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये लोकशाही मधील चौथ्या खांबावर पोलिसांनी हाल केला आहे. मुजफ्फर नगर दंगलीत एका टीव्ही पत्रकाराला गोळी मारण्यात आली होती. हिसार मध्ये कोणतेही कारण नसताना मिडिया कर्मचाऱ्यांवर लाठी चार्ज करण्यात आला आहे ज्या मध्ये कित्तेक पत्रकार गंभीर जखमी झाले आहेत, कित्तेकांचे क्यामेरे आणि किंमती सामान तुटल्याचे म्हटले आहे. मिडीयावर पोलिसांकडून होणाऱ्या लाठी चार्ज आणि हल्ल्या बाबत मिडिया गाईड लाईन तयार करावी अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला करण्यात आली आहे.