Friday 28 November 2014

सर्कुलेशनच्या खोट्या आकडेवारीद्वारे सरकारी तिजोरीची लुट

उत्तर प्रदेश - भ्रष्टाचाराबाबत ओरड करणारा आणि अश्या बातम्यांना मिर्ची मसाला लावून आपल्या वाचकांना आकर्षित करणारा लोकशाहीचा चौथा स्थंभ किती भ्रष्ट आहे याचा अंदाजा सर्कुलेशनच्या आकडेवारीवरून समोर येत आहे. उत्तर प्रदेशची लोकसंख्या २०११ च्या जणगणने नुसार २० करोड आहे. या लोकसंखेपेक्षा कित्तेक पटीने अधिक काही दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक वृत्तपत्रांचे सर्कुलेशन असल्याचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संगणकात नोंद झाले आहे. सरकारी जाहिराती मिळवण्याच्या लालसेपोटी एक हजार हून अधिक वृत्तपत्रांनी असे प्रकार केले असले तरी या पैकी काही मोजकीच वृत्तपत्र बाजारात आणि लोकांच्या घरामध्ये दिसत आहे. 
मिळालेल्या माहिती नुसार १ एप्रिल २०१३ ते ३० सप्टेंबर २०१४ या कालावधीत सर्कुलेशनची खोटी आकडेवारी सादर करणाऱ्या अश्या वृत्तपत्रांनी सरकारी तिजोरीतून जवळपास सव्वा अरब रुपये पेक्षा अधिक रक्कम लुटली आहे. उत्तर प्रदेश ची राजधानी असलेल्या लखनऊ मध्ये २९३ वृत्तपत्रांनी अशी खोटी आकडेवारी नोंद केल्याचे उघड झाले आहे. लखनऊची लोकसंख्या ४५ लाख असताना या पैकी बहुतेक वृत्तपत्रांनी आपल्या वृत्तपत्राचा खप ९० लाख असल्याचे नोंद केले आहे. सरकारी तिजोरीची मिडिया कडून आणि मिडियाच्या नावाने लुट होत असताना उत्तर प्रदेशचे माहिती व जनसंपर्क विभागातील अधिकारी मात्र मुग गिळून गप्प आहेत.