Wednesday 21 January 2015

"आज तक"चे सीइओ उत्तर प्रदेश विधानसभा समिती पुढे हजर

स्टिंग ऑपरेशनची चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा समिती पुढे मंगळवारी "आज तक" न्यूज च्यानेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी ( सीइओ ) यांनी हजेरी लावून समिती सदस्यांच्या प्रश्नांचा सामना केला.
"आज तक" ने उत्तर प्रदेश मधील दंग्या बाबत क्याबिनेट मंत्री आजम खान यांच्या संदर्भात एक स्टिंग ऑपरेशन दाखवले होते. या स्टिंग ऑपरेशन नंतर सर्वत्र हंगामा झाल्या नंतर विधानसभा अध्यक्ष माता प्रसाद पांडे यांनी २५ सप्टेंबर २०१३ ला आमदार सतीश कुमार निगम यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीने आजम खान यांच्यासह संबंधित पत्रकार यांची चौकशी केली आहे. समितीने स्टिंग ऑपरेशनची सीडीही बघितली आहे.