Saturday 27 June 2015

पत्रकार संघ निवडणुक - बांदल, मोकाशी, झवर... ५० हजारांचं काय झालं ?

मारुती कांबळेचं काय झालंअसा प्रश्न सामना चित्रपटात आहे, तसंच 50 हजारांचं काय झालंअसा प्रश्न मुंबई मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं विचारला जात आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघाचे तत्कालीन अध्यक्ष प्रसाद मोकाशी यांनी पत्रकार संघाची आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी अडीच लाखांची देणगी घेण्याचं ठरलं, त्यावर त्यांनी 50 हजारांचे कमिशन घेण्याचा प्रयत्न केला. तसा कमिशनचा चेक त्यांनी काढला. त्या चेकवर तत्कालीन कोषाध्यक्ष रमेश झवर आणि तत्कालीन कार्यवाह विजयकुमार बांदल यांनीही सह्या केल्या. खरं म्हणजे देणगीवर कमिशन घेणं नैतिकतेला धरुन नाही, किंबहुना आदर्श पदाधिकाऱ्यांनी ते घेऊच नये. मात्र कमिशन खाण्याच्या हव्यासापोटी त्यांनी कमी’शेण खाण्याचा प्रयत्न केला. कमिशनच्या चेकवर ज्यांनी सह्या केल्या त्या विजयकुमार बांदल, झवर, मोकाशी यांचं काय झालं? असा प्रश्न निवडणुकीच्या वर्तुळात चर्चीला जात आहे.