Sunday 28 June 2015

पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी देवदास मटाले यांची तिसऱ्यांदा निवड

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीत देवदास मटाले सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदी निवडून आले आहेत. शशिकांत सांडभोर यांच्या परिवर्तन प्यानलमुळे यावेळची निवडणूक चुरशीची झाली होती. निवडणुकीमध्ये परिवर्तन प्यानलचे कार्यकारणीमध्ये ५ आणि विश्वस्त पदावर एक उमेदवार निवडून आला असताना इतर पदावर मात्र मटाले गटाचेच वर्चस्व राहिले आहे. परिवर्तनचे शशिकांत सांडभोर यांनी मटाले यांना चांगलीच टक्कर दिली असली तरी सांडभोर यांचा पराभव झाला आहे. अध्यक्ष पदासाठी मटाले यांना १७०, सांडभोर यांना १३२, मोकाशी यांना ६९ तर वाभळे यांना ६४ मते मिळाली.

विजयी उमेदवार
अध्यक्ष - देवदास मटाले उपाध्यक्ष- प्रभाकर पवार व विजयकुमार बांदल कार्यवाह -प्रमोद तेंडुलकर कोषाध्यक्ष - दीपक म्हात्रे विश्वस्त - अजय वैद्य व प्रकाश कुलकर्णी
कार्यकारिणी सदस्य विष्णू सोनवणे 
भीमराव गवळी 
सत्यवान ताठरे
आत्माराम नाटेकर
कल्पना राणे 
दीपक परब 
महेश विचारे 
शैलेंद्र शिर्के
स्वाती घोसाळकर