Sunday 27 September 2015

देशोन्नतीचे पत्रकार देवेन्द्र वानखेडे यांच्या कुटूंबीयांना आर्थीक मदत करा

नागपूरचे पत्रकार देवेन्द्र वानखेडे यांचे नुकतेच गंभीर आजाराने निधन झाले. ते दै. देशोन्नती नागपूर आवृत्तीचे शहर संपादक होते. समाजिक, राजकिय पत्रकारीतेत त्यांचा दबदबा होता. एक उत्तम माणूस व पत्रकार असलेल्या वानखडे यांना वृतपत्राकडून कोणतीही आर्थिक मदत केली नसल्याने देशोन्नती व संपादक पोहरे यांच्याबाबत पत्रकारांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहे.   

त्यांची पत्नी सुनीता झाडे-वानखेडे याही पत्रकार. दोन पत्रकाराचा आपला डागडुजीचा संसार सुरु होता तोही मोडला. मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र यांचे कुठलेही सेवींग, पॉलीसी, फंड, ठेव नाहीत. झालच तर राहत्या घरावर भरमसाठ कर्ज आहे. सोबत दहा वर्षाच्या मुलीची आर्थीक जवाबदारी आहे. 

त्याच्या पत्नी सुनिता झाडे - वानखेडे या वॉऊचर पेमेंटवर देशोन्नतीत रिपोर्टींगला आहे. या आधी पुरवणीला होत्या पण नेमके याच दिवसात देशोन्नतीने पुरवणी विभाग अकोल्याला हलविले…शारिरीक अस्वस्थतेमुळे देवेंद्र ऑगस्ट महिन्यापासुन घरीच होते. ते कामावर नसल्याने त्यांना ऑगस्ट महिन्याचा पगार देण्यात आलेला नाही. कुटूंबाला मॅनेजमेंट कडून काहीतरी आर्थीक दिलास्याची अपेक्षा होती. पण तसे काहीही करण्यात आलेले नाही. 

ही देशोन्नतीचे प्रशासन आणि मालक निष्ठूर आहेत. देशोन्नतीसाठी अनेक वर्ष खस्ता खाणाऱ्या पत्रकाराच्या कुटुंबाची उपेक्षा केली हे योग्य नाही अशी चर्चा आहे. देशोन्नतीचे मालक पोहरे यांनी देवेंद्र वानखेडे यांच्या कुटूंबीयांना त्वरित आर्थीक मदत करावी अशी मागणी पत्रकारांकडून केली जात आहे.