Friday, 27 June 2014

कौटुंबिक वादातून पत्रकाराची हत्या

thakur
‘लोकमत’चे अंशकालीन वार्ताहर शिवसिंह बाबुलाल ठाकूर (४४) यांची काल राहत्या घरी (चिकणघर / म्हारळ) निर्घृण हत्या झाली. ठाकूर यांचा खून केल्यानंतर त्यांचा मृतदेह उघड्यावर जाळून व खून झाला त्या खोलीची फरशी धुऊन पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न झाला असून, या प्रकरणी ठाकूर यांची भावजय आणि पुतण्या यांना टिटवाळा पोलिसांनी ताब्यात घेतले. 

Thursday, 26 June 2014

आयबीएन लोकमतचे सुधाकर कश्यप विधानसभा लढवणार


 

आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीसाठी मुंबई मधून वृत्तसंकलन करणारे सुधाकर कश्यप यांनी विधानसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. कश्यप हे मुंबईच्या वरळी विधानसभा मतदार संघामधून निवडणूक लढवणार असल्याच्या बातमीची सध्या "व्हाट्सअप"वर चर्चा आहे. सुधाकर कश्यप यांना तळागाळातील समस्यांची माहिती आहे.पत्रकारितेच्या माध्यमातून कश्यप यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले असून कित्तेक प्रकरणांना वाचा फोडली आहे. यामुळे सध्या मंत्री असलेले सचिन अहिर यांना वरळी विधानसभा मतदार संघामधून चांगलेच आव्हान निर्माण झाले आहे. यामुळे कश्यप यांना धमकी मिळाल्याची माहिती बेरक्याला मिळाली आहे.….
सुधाकर कश्यप यांना बेरक्याच्या शुभेच्छा !!!


Monday, 23 June 2014

पत्रकार हल्ला व संरक्षण कायद्याची लढाई आता केंद्रीय स्तरावर

महाराष्ट्रामधील पत्रकारांना नोकरी व हल्ल्यापासून संरक्षण मिळावे तसेच पत्रकारांच्या सबंधित विविध कल्याणकारी मागण्यांसदर्भात चर्चा करण्यास वेळ मागूनही मुख्यमंत्री वेळ देत नसल्याने आता केंद्रीय स्तरावर या मागण्यांचा पाठपुरावा करू अशी माहिती "जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र" (JUM)चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नारायण पांचाळ यांनी दिली आहे.

'इंडिया टीव्ही'च्या तनु शर्मा यांचा आत्महत्येचा प्रयत्न



'इंडिया टीव्ही'च्या तनु शर्मा यांनी कार्यालयातच आत्महत्येचा प्रयत्न केला आहे . शर्मा यांनी आैषध-गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. शर्मा यांच्या सहकारी वर्गाने आत्महत्येच्या धमकीकडे गंभीरपणे लक्ष दिले नाही. नंतर तिला जानकबाद कार्यालयाच्या गेटवर जेव्हा रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या तेव्हा सुरक्षारक्षकाने वरिष्ठांना हा प्रकार कळविला. त्यानंतर खळबळ माजली. तनू शर्मा यांना तातडीने चॅनलच्या गाडीतून तात्काळ कैलास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 


Sunday, 22 June 2014

तंटामुक्त मोहिमेला प्रसिध्दी देणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम प्रभावी व यशस्वीपणे राबविण्यासाठी पूरक व प्रबोधनात्मक बातम्यांच्या माध्यमातून मोहिमेला प्रसिध्दी देणाऱ्या वृत्तपत्रांच्या बातमीदार, स्तंभलेखक आणि मुक्त पत्रकारांना पुरस्कार देण्यासाठी प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका सोमवार दिनांक 30 जून 2014 पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी रायगड-अलिबाग यांनी केले आहे.