Monday 23 June 2014

'इंडिया टीव्ही'च्या तनु शर्मा यांचा आत्महत्येचा प्रयत्न



'इंडिया टीव्ही'च्या तनु शर्मा यांनी कार्यालयातच आत्महत्येचा प्रयत्न केला आहे . शर्मा यांनी आैषध-गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. शर्मा यांच्या सहकारी वर्गाने आत्महत्येच्या धमकीकडे गंभीरपणे लक्ष दिले नाही. नंतर तिला जानकबाद कार्यालयाच्या गेटवर जेव्हा रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या तेव्हा सुरक्षारक्षकाने वरिष्ठांना हा प्रकार कळविला. त्यानंतर खळबळ माजली. तनू शर्मा यांना तातडीने चॅनलच्या गाडीतून तात्काळ कैलास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 



तनु शर्मा यांनी आत्महत्येच्या प्रयत्नापूर्वी 'फेसबुक'वर स्टेट्स अपडेट केले होते. या मध्ये "सर्वांना अखेरचा गुडबाय. मी आत्महत्या करीत आहे. इंडिया टीव्हीचे प्रशांत एमएन, अनिता शर्मा आणि रितू धवन यांना धन्यवाद. मी खूप मजबूत आहे; पण आता मजबूर झालीय. इंडिया टीव्हीने माझ्याबाबत जे केलेय ते भयानक आहे. प्रसाद सरांनी माझे जीवन उद्ध्वस्त केलेय. अनिता शर्मासाठी तर शब्द नाहीत. एक महिला असून ती अशी वागू शकते? भयानक षडयंत्री, विश्वासघातकी आहेत हे लोक. मृत्यूनंतरही मला इंडिया टीव्ही जॉईन केल्याचा पश्चाताप राहील!" असे म्हटले आहे.