Wednesday 19 June 2013

बेरके सगळीकडे निर्माण व्हावेत - बेरक्या उर्फ नारद

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे मंगळवेढा नगरी नावाचे दैनिक निघत आहे.या दैनिकात काम करणारे तानाजी चौगुले यांनी मंगळवेढ्याचा बेरक्या नावाचे सदर सुरू केले आहे.या सदरात त्यांनी अनेकांची फिरकी सुरू केली आहे.... 
चौगुले हे आम्हास नेहमी दैवत मानतात...त्यांना सांगू इच्छितो की,आम्ही दैवत नसून,त्यांचे मित्र आहोत. त्यांना शुभेच्छा....

असे बेरके सगळीकडे निर्माण व्हावेत,ही अपेक्षा..
बेरक्या उर्फ नारद
http://berkyanarad.blogspot.in

Monday 17 June 2013

मजिठिया आयोग राबविला जातो की नाही, हे पाहण्यासाठी तामिळनाडूत "स्पेशल सेल"

पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचाऱ्यांनी वेगवेगळे आयोग नेमून पत्रकारांसाठी वेतन निश्चिती केली असली तरी अनेक वृत्तपत्र समुहांनी या वेतन आयोगाच्या शिफारशींना केराची टोपली दाखविली.पत्रकारांच्या संघटनांनी वारंवार त्याकडं सरकारचं लक्ष वेधल्यानंतरही सरकारनं एकाही वृत्तपत्रावर कारवाई केली नाही.या पार्श्वभूमीवर पत्रकारांसाठीच्या मजिठिया वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी वृत्तपत्रे करतात की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी तामिळनाडू सरकारने  एका विशेष सेलची स्थापना केली आहे.किती वृत्तपत्रांनी मजिठिया वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी केली,कितींनी नाही यासंबंधीची माहिती हा सेल जमा करून तो सरकारला सादर करणार आहे.या सेलने दिलेल्या अहवालावर तामिळनाडू सरकार आयोग लागू न करणाऱ्या वृत्तपत्रांवर कारवाई करेल असे सरकार तर्फे सांगण्यात आल्याचे द हिंदूच्या बातमीत स्पष्ट कऱण्यात आलं आहे.अशा प्रकारची व्यवस्था करण्याची विनंती केद्रीय श्रम मंत्रालयाने केली होती.त्यानुसार हा सेल स्थापन कऱण्यात आला आहे.केंद्राने अशी विनंती केवळ तामिळनाडूलाच केली की,अन्य राज्यांनाही हे कळले नसले तरी तामिळनाडू सरकारने उचललेले पाऊल नक्कीच स्वागतार्ह आहे.

Saturday 15 June 2013

मुंबई मराठी पत्रकार संघाची 29 जून रोजी निवडणूक

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या व्दैवार्षिक निवडणुका येत्या 29 जून रोजी होत आहेत. 3 जूनपासून निवडणूक प्रक्रिया सुरू होत आहे.11 जून ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारिख आहे. यावेळी विद्यमान अध्यक्ष देवदास मटाले, माजी अघ्यक्ष नरेंद्र वाभळे,प्रसाद मोकाशी आणि बांदल हे अध्यक्षपदासाठी इच्छूक असल्याचे समजते.सर्व इच्छूकांनी जुळवाजुळवी सुरू केली आहे.

पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच विश्वस्थपदाच्या एका जागेसाठी देखील निवडणूक होत असून या जागेसाठी कुमार कदम इच्छूक आहेत.कुसुमताई रानडे यांच्या निधनानं ही जागा रिक्त झाली आहे. मध्यंतरी विश्वस्थांची संख्या वाढवून आपल्या मर्जीतल्या काही लोकांना विश्वस्थ मंडळावर घेण्याच्या हालचाली सुरू होत्या पण त्याला अजून तरी यश आलं नाही असं दिसतंय...

पत्रकारांमधील गटबाजी भोवली

त्रकारांमधील गटबाजीमुळे पत्रकारांचे कुठलेच विषय मार्गी लागत नाहीत हा आपल्याकडचा अनुभव.गटबाजी आणि खेकड्याच्या वृत्तीचा फटका पत्रकारांच्या अनेक चळवळींनाही बसतो.त्याचेही अनेक उदाहरणं देता येतील.मात्र हे सारं मराठी प्रांतातच चालतं असं नाही.राजस्थानमध्ये पत्रकारांमधील अशाच गटबाजीचा फटका पत्रकारांनाच बसला आहे.राजस्थान सरकारने  उदयपूर मधील 101 पत्रकारांना प्लॉट दिले होते.मात्र या प्लॉटचे वाटप करताना अनेक अनियमितता झाल्याचा आरोप करीत काही जण न्यायालयात गेले.आता न्यायालयाने प्लॉट वितरण प्रक्रियाच स्थगित केली आहे.आता या प्लॉटचं पुन्हा वितरण होणार आहे.म्हणजे तेल ही गेले आणि तूप ही गेले अशी अवस्था पत्रकारांची झाली आहे.पत्रकारितेला असलेला हा गटबाजीचा शाप कसा दूर करायचा याचा विचार सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन केला पाहिजे.

बेरक्या

बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो.

बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो.
------------------------------------
पत्रकार झाले म्हणजे काही जणांना वाटते,आपल्या हाती 'ब्रम्हअस्त्र' आले.या अर्ध्या हळकुंडात न्हालेल्या पत्रकारांना 'शालजोडे' मारण्यासाठी बेरक्याचा जन्म झालेला आहे.बेरक्या चांगल्या पत्रकारांच्या विरोधात कधीच नाही आणि राहणार नाही.त्यामुळे बेरक्याबाबत कधीच गैरसमज बाळगू नका.
....................................
बेरक्या,कोणत्याही वृत्तपत्र आणि चॅनलच्या मालक,संपादक आणि पत्रकारांच्या विरोधात नाही.प्रवृत्तीच्या विरोधात आहे.ज्यांची प्रवृत्ती वाईट,त्यांच्यावर बेरक्याचा 'प्रहार'...जे चांगले काम करतील,त्यांना बेरक्याचा 'सलाम'.
त्यामुळे बेरक्याला 'मित्र' करायचे की 'शत्रू'.याचा विचार करा.
-------------------------------
बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला पुढील  ई-मेल पत्त्यावर पाठवावेत - berakya@gmail.com