Friday 10 January 2014

पत्रकारांनी कामगार कायद्यानुसार लढावे - माने

मुंबई : पत्रकारांवरील हल्ल्याच्या विरोधात संरक्षण कायदा, अर्धवेळ, कंत्राटी व असंघटित पत्रकार, नवृत्तीवेतनाच्या समस्या अशा अनेक अडचणी समोर आल्या आहेत. त्यामुळे सशक्त समाज निर्मितीसाठी कार्यरत असलेल्या पत्रकारांनी आता स्वत: कामगार कायद्यानुसार न्यायासाठी लढले पाहिजे, असे आवाहन माजी आ.बाबुराव माने यांनी केले. भारतीय पत्रकार संघाच्या वतीने आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.
सध्याच्या काळात प्रसारमाध्यमांचे विशेष महत्त्व आहे. बदलती सामाजिक परिस्थिती त्यांच्यापुढे आव्हान निर्माण करत आहे. त्याचबरोबर अनेक बदलदेखील होत आहेत. पत्रकारांना कामासाठी बाहेर पडावे लागते.त्यामुळे कुटुंबाची अवहेलना होत असते. या सर्व गोष्टींचा परिणाम त्यांच्या जीवनशैलीवर आणि प्रकृतीवर होत आहे. समाजातील प्रत्येक घटकाची बाजू प्रबळपणे मांडताना स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ नसतो. पत्रकारांना त्यांच्या क्षेत्राबद्दल तक्रार करायला संकोच वाटत असतो. सशक्त समाजनिर्मितीमध्ये प्रसारमाध्यमे महत्त्वाचा घटक असून ही मंडळी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कणखर असली पाहिजे, असे प्रतिपादन माने यांनी केले.
https://www.facebook.com/berkya.berkya