Tuesday 14 January 2014

टाइम्स नाऊ, इंडिया न्यूजवर युपी सरकारची अघोषित बंदी

कधी माध्यमकर्मीवर किंवा माध्यमांवर थेट हल्ले करायचे,कधी वृत्तपत्रांच्या जाहिराती बंद करायच्या,तर कधी माध्यमांवर वेगवेगळ्े दबाव आणून त्यांची कोंडी करायची हे असे वेगवेगळे फंडे आजमावत माध्यमांचा आवाज बंद करायचे मार्ग सर्रास सर्वत्र वापरले जातात.मात्र उत्तर प्रदेशच्या अखिलेश यादव सरकारने आता राज्यातील केबल ऑपरेटरवर दबाव आणि टाइम्स नाऊ आणि इंडिया न्यूज या इंग्रजी वाहिन्याचे प्रक्षेपण बंद करण्यास भाग पाडले आहे.त्यामुळे संपूर्ण उत्तर प्रदेशात टाइम्स नाऊ आणि इंडिया न्यूज दिसत नाही अशी बातमी आज टाइम्स ऑफ ंइंडियानं दिली आहे. 

दोन इंग्रजी चॅनल्सना ब्लॅक आउट करण्याची यादव सरकारची कृती माध्यमांचा आवाज बंद कऱण्याच प्रय़त्न आहे.लोकशाहीत हे मान्य होण्यासारखे नाही महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने या ब्लॅक आऊटचा निषेध केला असून वाहिन्यांवर घातली गेलेली अघोषित बंदी तातडीने मागे ध्यावी अशी मागणीही समितीने एका प्रसिध्द पत्रकाव्दारे केली आहे.

मुलायमसिंग यांचे मुळ गावात सैफई महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं.अनेक नट-नट्यांना तिथं बोलावून नाचवलं गेलं.एकीकडे मुझफ्फराबाद येथील दंगल पिडित थंडी आणि उपासमारीने त्रस्त असताना अखिलेश यादव सरकार नाच गाण्यात दंग होते.हा विरोधाभास सर्वच माध्यमांनी जगासमोर आणल्याने समाजवादी पार्टीच्या नेत्यांचे माथे भडकले.एका पत्रकार परिषदेत मग अखिलेश यादव यांनी अगोदर दैनिक जागरण वर हल्ला चढविला.जागरणच्या मालकाला दोन वेळा राज्यसभेवर पाठविले होते.तिस़ऱ्यावेळेस त्यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी सरकार्चाय विरोधात बातम्या छापायला सुरूवात केली असंा आरोप यादव यांनी केलाय. 
नंतर त्यांनी एनडीटीव्हीवर हल्ला चढविला. त्यानंतर अन्य एका इंग्रजी चॅनलवर आरोप करताना त्या चॅनलच्या वार्ताहराल दिवसभर हेलिकॉफ्टरमधून फिरवून आणल्यानंतरही त्यानं एक ओळीची बातमीही दिली नाही असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. आता तर टाइम्स नाऊ आणि इंडिया न्यूज या वाहिन्यांचे प्रक्षेपण करू नका असा तोंडी आदेश राज्यातील केबल ऑपरेटर्सना देऊन माध्यमांची मुस्कटदाबी कऱण्याचा प्रयत्न सरकारने चालविला आहे याचा देशभरातील माध्यमांनी निषेधच केला पाहिजे.

केंद्रीय माहिती आणि जनसंपर्क मंत्री मनीष तिवारी यांची याबाबतची भूमिका संतापजनक आहे.ज्या वाहिन्यांना ब्लॅक आउट करण्यात आलं आङे त्यांनी तक्रार केली तर आम्ही त्याची दखल घेऊन आणि सरकारने काही नियमबाह्य केले आहे असे दिसून आले तर योग्य ती कारवाई करू असे त्यांनी म्हटले आहे.
प्रेन्स कौन्सिलचे चेअरमन नेहमीच वेगवेगळी वक्तव्य करून प्रशिध्दीच्या झातात राहण्याचा प्रयत्न करीत असतात.मात्र आज देशात कधी नव्हे अशा पध्दतीनं माध्मयंंासमोर आव्हानं उभी असतानाही प्रेस कौन्सिल मुग गिळून गप्प आहेत. देशभरातील माध्यमांनी एकत्र येत यादव सरकाच्या मनमानीच्या विरोधात आवाज उठविण्याची आज गरज आहे.

http://batmeedar.com मधून साभार