Thursday 20 March 2014

सोनपेठमध्ये सामनाच्या पत्रकाराला अमानूष मारहाण

परभणी जिल्हयातील सोनपेठ येथील सामनाचे पत्रकार भागवत शंकर आप्पा पोपडे यांच्यावर राष्ट्रवादीच्या काही गुंडांनी काल रात्री आमानूष हल्ला केला. दहा ते पंधरा गुंडांनी हा हल्ला केला.
पोपडे यांना मारहाण होत असताना ते जिवाच्या आकांताने ओरडत पोलिस स्टेशनच्या दिेशेने पळत होते तेव्हा असंख्य बघे हा प्रकार पहात होते पण कोणीही पोपडे यांची सुटका केली नाही. एखाद्या चित्रपटात शोभावे असे हे दृश्य होते.हा प्रकार सुरू असताना काही जणांनी पोलिसांना फोन केला पण साहेब शिवजयंतीच्या बंदोबस्तात आहेत असे उत्तर दिले.पोलिस स्ठेशन गाठल्यावर पोपडे यांनी तक्रार दाखल केली आङे.त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि खिश्यातील एक हजार रूपये गुंडांनी लंपास केले आहेत.याबाबतची त्रक्रार पोलिसात दाखल केली पण अजून गुन्हा दाखल केला गेलेला नाही.सोनपेठचे पीआय कापकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले.मात्र मारहाणीचा गुन्हा दाखल करू पण दरोड्याचा गुन्हा दाखल करता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल.याविरोधात सोनपेठचे पत्रकार तसेच परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तसेच पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे पदाधिकारी आज परभणी जिल्हा पोलिस अधीक्षकांना भेटणार आहेत.हा विषय आर.आर.पाटील यांच्या कानावर घालण्यात आला आहे.शिवसेनेचे बंडू जाधव यांच्या कार्यक्रमाची बातमी दिल्याने संतापून हा हल्ला केला गेला आहे.पत्रकारांनी कार्यक्रमाच्या बातम्याही द्यायच्या नाहीत काय असा प्रश्ऩ आता विचारला जात आहे.