Thursday 24 April 2014

मुंबईमध्ये पोलिसांची पत्रकाराला मारहाण

जनादेश वृत्त वाहिनीचे संपादक सुरेश पाटील मनसे आणि सेने मधल्या राड्याचे चित्रीकरण करण्यास गेले असता पाटील यांना पन्हाळे आणि मोहन अडसूळ या दोन पोलिस उपनिरीक्षकांनी ट्रॉम्बे पोलिस ठाण्यामध्ये जबर मारहाण केली. तसेच त्यांनी चित्रीकरण केलेली डिव्ही पोलिसांनी काढून घेतली आहे. पाटील यांना शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली आहे. याबाबत अद्याप कोणावरही कारवाही झाली नसल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत मिळालेल्या माहिती नुसार बुधवारी निवडणुकीच्या आदल्या रात्री मुंबईतल्या मानखुर्दमध्ये शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या संघर्षात पोलीस कॉनस्टेबल गंभीर जखमी झालाय. कार्यकर्त्यांसाठी पाणी आणि इतर साहित्य घेऊन जाणारी मनसेची गाडी शिवसेना कार्यकर्त्यांनी अ़डवली, आणि त्यानंतर त्या गाडीवर दगडफेक केली असा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केलाय. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातले शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे यांच्या पत्नीही घटनास्थळी उपस्थित होत्या. पोलिसानी याठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलिस तैनात केले आहे.

दरम्यान मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने दक्षिण मुंबई मध्ये शिवसेनेचे उमेदवार असलेल्या राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळेच्या विरोधात ( कलम ३०७,३३२,१४३,१४९,११४ नुसार ) खुनाचा प्रयत्न करणे,सरकारी कर्मचार्याला मारहाण, दंगल माजवणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर ५ जणांना अटक केली आहे.