Sunday 25 May 2014

पुनम पोळ प्रकरणी संपादक आणि जनसंपर्क अधिकारी अडचणीत



मुंबई तरुण भारत वृत्तपत्रासाठी मुंबई महानगर पालिकेमध्ये वृत्तसंकलन करणाऱ्या पूनम पोळ यांना जनसंपर्क अधिकाऱ्याच्या शौचालयामधील स्ल्याब पडल्याची, स्ल्याब मधून पाणी गळत असल्याची बातमी प्रसिद्ध केल्याने आपली नोकरी गमवावी लागली आहे. पोळ यांची नोकरी जाण्यामागे जनसंपर्क अधिकाऱ्याने  वृत्तपत्राच्या जाहिराती बंद करण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. 
जाहिराती बंद झाल्यास आपले वृत्तपत्र बंद पडेल आशी भीती निर्माण झालेल्या मुंबई तरुण भारत प्रशासनाने पोळ यांना नोकरी वरून काढण्याचा निर्णय घेतला होता. परंतू पालिकेतील काही पत्रकार, पत्रकार संघटना आणि बेरक्याने पोळ यांना पाठींबा दिल्याने मुंबई तरुण भारतचे प्रशासन चांगलेच हादरले आहे. बेरक्याने हे प्रकरण हाताळल्याने तरुण भारतच्या जाहिरातीवर परिणाम झाला असून कार्यकारी संपादक शेलार यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढला आहे. 

कार्यकारी संपादकांवर नोकरी सोडण्यासाठी दबाव वाढत असताना मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी जनसंपर्क अधिकारी विजय खबाले यांना चांगलेच खडसावले आहे. पोळ यांनी पालिका आयुक्तांना दिलेल्या तक्रारीचे पत्र सामान्य प्रशासनाचे उप आयुक्त आचरेकर यांच्याकडे आले असून जनसंपर्क अधिकाऱ्यावर कडक कारवाही केली जाणार आहे अशी माहिती उपलब्ध झाली आहे. तर मुख्यमंत्री कार्यालयाने सुद्धा या प्रकरणाची चांगलीच दखल घेतली असून नगर विकास विभागाचे सचिव श्रीकांत सिंग यांना उचित कारवाही करावी असे आदेश देण्यात आले आहेत. 

जनसंपर्क अधिकाऱ्याने दिलेल्या धमकीमुळे एका पत्रकाराची नोकरी गेली असताना पालिकेतील काही मोजके पत्रकार पोल यांच्या बाजूने उभे राहिले असताना पालिकेतील जुने आणि वर्षानु वर्षे पालिकेत चिकटून बसलेल्या सेटिंगबाज पत्रकारांनी मात्र या प्रकरणापासून आपल्याला अलिप्त ठेवले आहे. जनसंपर्क अधिकार्याकडून वेळोवेळी या पत्रकारांना पिकनिकला, खायला, पियायला नेले जात असल्याने तसेच पालिकेतून पाकिटे मिळवून देण्यात जनसंपर्क अधिकाऱ्याचा सहभाग असल्याने येथील जुन्या म्हणवणाऱ्या पत्रकारांनी बघ्याची भूमिका घेतलेली आहे. नुकतेच हे पत्रकार भिवंडी येथील पिकासो हॉटेल आणि बार मध्ये जनसंपर्क अधिकाऱ्या बरोबर गेल्याची माहिती बेरक्याला मिळाली आहे. 

जनसंपर्क अधिकाऱ्याकडून अन्याय अत्याचार होत असताना पालिकेतील काही जुने पत्रकार लुच्चे गिरी करत आहेत, खबालेच्या विरोधात गेलो तर आपली पाकिटे आणि पार्ट्या बंद होतील. म्हणून आपल्या तोंडाला कुलूप लावलेले पत्रकार आपला स्वाभिमान खबालेला विकून बसले आहे. स्वताच्या स्वार्थासाठी पाकीटांसाठी खबालेची लुच्चेगिरी करणाऱ्या पत्रकारांवर त्यांची वृत्तपत्रे कारवाही का करत नाहीत, या पत्रकारांच्या संपादकांना पण यामधील हिस्सा पोहोचतो कि काय असे प्रश्न उपस्थित होत आहेत. 

पुनम पोळ प्रकरणात मुंबई तरुण भारतच्या प्रशासनाने पोळ यांच्या मागे उभे राहायचे सोडून मैदानातून पळ काढला होता. उप संपादक, संपादक किवा कार्यकारी संपादक यापैकी कोणालाही आपण छापलेली बातमी खरी आहे कि खोटी याची शहानिशा करावी असे वाटलेले नाही. पोळ प्रकरण अंगाशी आल्याने या महिलेला परत जास्त पगार देतो, कार्यालयात बस, नोकरी असली तर खाबालेशी तू सामना करू शकते असे गोड बोलून आपली गेलेली आबरू वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.