Friday 6 June 2014

पालिका वार्ताहर संघाच्या सेटिंगवाल्या निवडणुकीची घोषणा

भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातील महानगरपालिकेमधील पत्रकार व त्यांच्या वार्ताहर संघटनेचे बेरक्याने वाभाडे काढल्यावर वार्ताहर संघाच्या निवडणुका घेण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. निवडणूक घेताना पालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याला निवडणूक अधिकारी नेमल्याने यावेळीही जनसंपर्क अधिकारी ठरवणार तेच पत्रकार पदाधिकारी होणार असल्याने अश्या सेटिंगवाल्या निवडणुका घेण्याची गरजच काय असा प्रश्न वार्ताहर संघाच्या काही सभासदांनी विचारला आहे. 

महानगरपालिकेमध्ये "बृहन्मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघ" हा पत्रकार संघ गेले कित्तेक वर्षे कार्यरत आहे. पत्रकारांना सोयी सुविधा मिळवण्यासाठी, पत्रकारांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी या वार्ताहर संघाची स्थापना करण्यात आली होती. गेल्या काही वर्षामध्ये पत्रकारांसाठी वार्ताहर संघाने कोणतेही उपक्रम राबवलेले दिसत नाही. वार्ताहर संघाचे काही पदाधिकारी पालिकेतील सत्ताधारी, नगरसेवक, गट नेते यांच्या प्रेस नोट बनवून देणे, त्या आपल्या वृत्तपत्रात बातमी म्हणून छापून आणण्यात आणि बातमी आली कि साहेब, म्याडम आमच्याकडे बघा किवा पंडित को दक्षिणा नाही दोगे असे बोलत पैसे वसुली करण्यात गुंग असल्याने पत्रकारांच्या हिताकडे पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले होते. 

याच दरम्यान येथील काही पत्रकारांनी एका कामगार कायद्यानुसार नोंदणीकृत असलेल्या युनियनशी सलग्न करत पालिकेमध्ये आणखी एक पत्रकार संघ स्थापन केला आहे. वार्ताहर संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या चुकांमुळे हा पत्रकार संघ स्थापन झाला आहे असेच म्हणावे लागेल. वार्ताहर संघाकडून काय चुका झाल्या किवा पदाधिकार्यांनी काय दिवे लावले याचे वाभाडे "बेरक्याने" वेळोवेळी काढले आहेत. बेरक्याने पालिका वार्ताहर संघ आणि पदाधिकाऱ्यांचे वाभाडे काढल्यावर वार्ताहर संघाच्या सुजित महामुणकर या अध्यक्षांनी राजीनामा (या राजीनाम्याची प्रत एका पदाधिकाऱ्याने बेरक्या पर्यंत पोहचवली असून राजीनाम्याची प्रत येथे प्रसिद्ध केली आहे) दिला आहे. कार्यकारणीची मुदत २०१२ ते २०१४ पर्यंत होती ती संपल्यावर अध्यक्षांनी वाभाडे निघताना राजीनामा दिला असल्याने आता राजीनाम देवून काय फायदा जी इज्जत जायची ती गेलीच अशी प्रतिक्रिया वार्ताहर संघाच्या बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आली. 

अध्यक्षाने आपल्या पदाचा राजीनामा दिल्यावर ४ जूनला पालिका वार्ताहर कक्षामध्ये एक बैठक घेवून नव्याने निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील वेळी पालिकेच्या जनसंपर्क अधिकारयाने वार्ताहर संघावर कोण पदाधिकारी असावे हे ठरवून त्या पत्रकारांची त्या पदावर नेमणूक केली होती. त्याच जनसंपर्क अधिकाऱ्याला आता निवडणूक अधिकारी म्हणून नेमण्याचा निर्णय वार्ताहर संघाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. यामुळे वार्ताहर संघामधील काही सभासदांनी नाराजी व्यक्त केली असून मागील निवडणुकीप्र माणेच जनसंपर्क अधिकारीच पदावर कोणी राहायचे हे ठरवणार असतील तर निवडणुका जाहीर करून काय फायदा असा प्रश्न उपस्थित केला आहे.

बेरक्याने वार्ताहर संघाचे काढलेले वाभाडे वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या 

बेरक्या इफेक्ट - पालिका वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदाचा महामुणकर यांनी दिला राजीनामा

पालिकेतील पत्रकार संघाच्या पदाधिकार्यांना धमक्या

पुनम पोळ प्रकरणी संपादक आणि जनसंपर्क अधिकारी अडचणीत