Wednesday 6 August 2014

महिलेवर अतिप्रसंग करणाऱ्या भुरट्या पत्रकाराला अटक

मध्य प्रदेश मधील बरुडठाणे सिनखेडा येथील एका व्यक्तीने पत्रकार बनून महिलेशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामस्थांच्या पकडून या भुरट्या पत्रकाराला पोलिसांच्या स्वाधीन केले असून पोलिसांनी या भुरट्या पत्रकाराची रवानगी जेल मध्ये केली आहे. 

मिळालेल्या माहिती नुसार अयुब रहमान खान (४५) हा व्यक्ती सोमवारी ( ४ ऑगस्ट ) रात्री ११ वाजता एका २३ वर्षीय महिलेच्या घरी घुसला.आणि तिच्याशी अतिप्रसंग करू लागला यावेळी सदर महिलेने आरडओरडा केला असता अयुबने आपण पत्रकार असल्याची धमकी दिली. अयुबच्या धमक्यांना न घाबरता महिलेने आरडओरड सुरूच ठेवल्याने आजूबाजूच्या रहिवाश्यांनी येवून आयुबला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. महिला आणि ग्रामस्थांच्या तक्रारीवरून अयुब विरोधात बलात्काराचा गुन्हा तसेच अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अयुबला मंगळवारी कोर्टात उभे केले असता त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अजाक ठाण्याचे डीएसपी अनावर चंद्रवंशी यांच्यासही संपर्क साधल्यावर विवध वृत्तपत्र व जनसंपर्क विभागांकडे चौकशी केली असता अयुब याची कुठेही नोंद नसल्याचे निदर्शनास आले आहे. तो भुरटा पत्रकार असून त्याच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.