Thursday 11 September 2014

जय महाराष्ट्राचे पत्रकार पगारे यांना न्याय मिळणार

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे जय महाराष्ट्र वृत्तवाहीनीसाठी वृत्तसंकलन करणारे पत्रकार किशोर पगारे यांच्याशी अंबरनाथ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विलास सोनावणे यांनी गैरवर्तवणूक केली होती. 


याबाबत पगारे यांनी "महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघा"कडे तक्रार केली असता पत्रकार संघाचे पत्रकार उपेंद्र बोऱ्हाडे आणि प्रदेश उपाध्यक्ष विश्वास आरोटे यांनी याप्रकरणाची सविस्तर तक्रार संबंधित अधिकारी आणि राज्य सरकारकडे केली आहे. तर  पत्रकार व कायद्याने वागा चळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांनी ठाणे पोलिस सहआयुक्त लक्ष्मीनारायणन यांच्याशी संपर्क साधून पगारे यांच्याबरोबर झालेला गैरवर्तवणूकीचा प्रकार सांगून योग्य न्याय द्यावा अशी मागणी केली होती. 

पोलिस सहआयुक्तांनी अंबरनाथ विभागाच्या पोलिस उपायुक्तांना वैयक्तिक लक्ष घालून घटनास्थळी जावून प्रकरण हाताळण्याचे व आवश्यक कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहेत. गुरूवार ११ सप्टेंबरला अंबरनाथ पोलिस ठाण्यात किशोर पगारे यांनी येवून आपले म्हणणे मांडावे असा निरोप पोलिस उपायुक्तांकडून पाठवण्यात आला आहे. पगारे यांना पाठींबा देण्यासाठी पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली एकजूट दाखवावी असे आवाहन पत्रकार संघाने केले आहे.