Tuesday 9 September 2014

तेलंगणा मधील टीव्ही ९ चे प्रक्षेपण सरकारने बंद पाडले

चार महिन्यापूर्वीच निर्माण झालेल्या तेलंगणा राज्यामध्ये सरकारने दडपशाही सुरु केली आहे. याचाच एक भाग म्हणून टीव्ही ९ तेलगू या वृत्तवाहिनीचे प्रक्षेपण बंद पाडले आहे. वृत्तवाहिनीचे प्रक्षेपण का बंद केले याचे नेमके कारण सरकारने दिलेले नसले तरी तेलगू भाषेमध्ये बातम्या प्रसारित होत असल्याने प्रक्षेपण बंद पाडण्यात आले आहे.


तेलंगणा सरकारने दडपशाही करत वृत्तवाहिनीचे प्रक्षेपण बंद पाडल्याने टीव्ही ९ च्या शेकडो कर्मचार्यांनी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या निवासस्थाना समोर तीव्र निदर्शने केली असता पोलिसांनी आक्रमक होत पत्रकारांबरोबर धक्काबुक्की केली आहे. महिला पत्रकारांशी असभ्य असे वर्तन करण्यात आले आहे. कित्तेक पत्रकारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सरकारच्या या दडपशाहीचा बेरक्या जाहीर निषेध करत आहे.