Thursday 4 September 2014

पश्चिम घाट वाचवण्यासाठी पत्रकाराची सायकल यात्रा

मानवी हस्तेक्षेपामुळे पश्चिम घाट आणि तेथील प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पश्चिम घाटाला नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी कोयंबतूरच्या एका दूरचित्रवाहिनीच्या आर. कलाई सेलवन या पत्रकाराने तामिळनाडू, केरळ, गोवा, कर्नाटक या चार राज्यामध्ये ३०८० किलोमीटर सायकल वरून प्रवास केला आणि पश्चिमी घाट वाचवण्याचा संदेश दिला. पश्चिम घाटाला युनेस्कोने जागतिक वारसाच्या यादीमध्ये समावेश केला आहे.

३३ वर्षीय आर. कलाई सेलवन यांनी ६ जुलैला आपली यात्रा सुरु केली होती. मागच्याच आठवड्यात आपली यात्रा पूर्ण करून ते परत आले आहेत. या यात्रे दरम्यान निसर्गाने मला पूर्ण साथ दिली काही घटना सोडल्यास संपूर्ण यात्रा आठवणीत राहील अशी झाली असे सेलवन यांनी सांगितले. सायकल यात्रे दरम्यान आलेल्या अनुभवाची लेख माला तयार करण्याचा मनोदय सेलवन यांनी व्यक्त केला आहे. सायकल यात्रे नंतर पर्यावरण विषयक वृत्तपत्रांकडून सेलवन यांना चांगल्या संधी मिळत आहेत.