Monday 8 September 2014

पत्रकार वेदप्रताप वैदिक पुन्हा बरळले

वैदिकांचे प्रताप( अग्रलेख )
मुंबई हल्ल्यातील सूत्रधार हाफिज सईदची भेट घेणारे व योगगुरू रामदेवबाबा व संघ परिवाराशी जवळीक असणारे वाद्ग्रस्त जेष्ठ पत्रकार वेदप्रताप वैदिक यांनी भारतीय संसदे विषयी आक्षेपार्ह विधान केले आहे. हाफिज सईदची भेट घेतल्याने संसदेमधील सर्व ५४३ खासदारांनी मला फाशी द्या असा निर्णय घेतला तर मी अश्या संसदेवर थुंकतो असे वक्तव्य वेदप्रताप वैदिक यांनी केल्याने पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.

अजमेर येथील एका साहित्य संमेलनात वैदिक बोलत होते. यावेळी बोलताना मला जे सत्य वाटत त्या साठी मी लढतो. मल्ल अटक करावी अशी दोन खासदारांनी मागणी केली आहे. संसदेतील दोनच काय सर्वच्या सर्व ५४३ खासदारांनी मला एकमताने अटक करण्याची किंवा फाशी देण्याची मागणी केली तर मी अश्या संसदेवर थुंकतो. अशी मागणी करणारे खासदार चुलीत गेले पाहिजेत. ते सर्व खासदार मूर्ख असून मी त्यांची मागणी कधीच ऐकून घेणार नाही असे म्हटले आहे. वैदिक यांनी संसादेबाबत असे वादग्रस्त विधान केल्याने संमेलनात उपस्थितांनी तीव्र नाराजीच सूर उमटला आहे.

संबंधित बातम्या 

वैदिकांचे प्रताप 

http://berakya.blogspot.in/2014/07/blog-post_17.html

पत्रकार वैदिक यांच्या सईद-मुशर्रफ भेटीनं राजकीय क्षेत्रात खळबळ