Saturday 4 October 2014

जेष्ठ पत्रकार यशवंत पाध्ये यांचे निधन

महाराष्ट्र संपादक परिषदेचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार यशवंत पाध्ये यांचे आज शनिवारी सकाळी ५.३० च्या सुमारास पुणे येथे निधन झाले. पाध्ये यांच्या हृदयावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र त्या नंतरही त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांचे निधन झाले आहे. मृत्यू समयी त्यांचे वय ७९ वर्ष होते.


मुळच्या कोकणातल्या असलेल्या पाध्ये यांनी दैनिक सागर व रत्नागिरी टाईम्स मधून पत्रकारिता केली होती. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे ते अध्यक्ष होते. शंकर राव चव्हाण पत्रकार कल्याण निधी तसेच अधिस्वीकृत समितीवर पाध्ये यांनी काम केले आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांचा दलित मित्र पुरस्कार देवून गौरव केला होता. पाध्ये यांची विविध विषयांवर पुस्तके प्रसिध्द असून त्यांना पत्रकारितेत विविध पुरस्कार मिळाले होते.