Monday 22 December 2014

पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा बादशाहाला मुजरा - आजच्या बैठकीमध्ये खडाजंगी होणार

मुंबई मराठी पत्रकार संघावर भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या पत्रकारालाच पुरस्कार देण्याचे जाहीर केल्याने पदाधिकारी या बादशाहाला मुजरा घालू लागले कि काय असा प्रश्न उपस्थित करत २२ डिसेंबर रोजी संपन्न होणाऱ्या मासिक बैठकीमध्ये खडाजंगी होणार असल्याचे वृत्त आहे. 

मिळालेल्या माहिती नुसार मुंबई मराठी संघाचा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. या वर्धापन दीना निमित्त मुंबई मधील काही पत्रकारांना पुरस्कार देवून गौरवण्यात येणार आहे. विचार न करता दिला जाणाऱ्या पुरस्कारा वरून पत्रकार संघाच्या सभासदांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. 

काही वर्षापूर्वी याच पत्रकार संघाच्या निवडणुकीपूर्वी अग्रलेखाच्या बादशाहने सर्व सभासदांना पत्र आणि आपल्या वृत्तपत्रात प्रसिद्ध बातम्यांचे कात्रण पाठवले होते. या पत्रात आणि बातम्यांमध्ये पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांवर खुले आम भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला होता. पत्रकार संघाच्या कर्जत येथील जागे मध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येवून पत्रकार संघाची लख्तरे वेशीवर टाकली होती. अग्रलेखाच्या बादशाहने केलेल्या लिखाणामुळे पत्रकार संघाच्या सभासद आणि पदाधिकाऱ्यामध्ये चांगालाच संताप निर्माण झाला होता. 

आता याच बादशहाला पत्रकार संघाने पुढारीकारांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार देण्याचे जाहीर केले आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाची लक्तरे वेशीवर टाकणाऱ्या बादशाहाला सध्याचे कार्यकारी मंडळ विसरले का ? पदाधिकारी बादशाहाला घाबरले आहेत का ? बादशहा आणि पदाधिकारी यांच्या मध्ये काही सेटिंग झाली म्हणून हा पुरस्कार बादशाहाला दिला जात आहे का? असे अनेक प्रश्न सध्या सभासद उपस्थित करत आहेत.