Thursday 18 December 2014

टीव्हीजेए कॅलेंडरच्या जमा रकमेतून पत्रकारांना मदत करणार

टी. व्ही. जर्नालिस्ट असोशिएशन हि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातल्या पत्रकारांची संघटना धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणीकृत आहे. संघटनेच्या वतीनं येत्या वर्षाचं ( सन २०१५ चे ) कॅलेंडर काढण्यात येणार आहे. त्यातून जो निधी जमा होईल तो पत्रकारांच्या कल्याणासाठी म्हणजेच मेडीक्लेम, आरोग्य शिबिरं, पत्रकारांसाठी अभ्यासवर्ग, अपघात झाल्यास मेडीकलसाठी मदत, किंवा सदस्याच्या अन्य मदतीसाठी वापरात आणण्याच्या योजना टीव्हीजेएच्या आहेत. 


या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी निधी लागणारच. हा निधी कॅलेंडर काढून जमा करण्याचा प्रयत्नं केला जात आहे. कामाच्या तणावात अनेक पत्रकार आजारांनी त्रस्त आहेत. कधी कोणता आजार बळावेल  सांगता येत नाही. म्हणूनच संघटनेच्या माध्यमातून सदस्यांना आधार देण्याचा प्रयत्नं केला जात आहे. यासाठी कॅलेंडरसाठी जाहिराती घेउन निधी जमवण्यात येणार आहे. 

तरी जाहिरात देण्यासाठी विलास आठवले- संपर्क- 9867539999, मयुर परिख - 9819344277
अथवा टीव्हीजेए कार्यालय, इन्सांहटमेंट, मंबई महापालिका मार्ग, आझाद मैदान, मंबई- 1 येथे , कार्यालयीन कर्मचारी सागर सोनार- 8898636476 यांच्याशी संपर्क संपर्क साधावा असे आवाहन विलास आठवले यांनी केले आहे.