Wednesday 24 December 2014

मुबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी रास्ता रोको

पेण-मुबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे बंद पडलेले काम त्वरित सुरू करावे यामागणी साठी २३ जानेवारीला पेण येथे एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाल कोकणातील पत्रकारांनी रास्ता रोको आंदोलन केले. गांधी स्मारकापासून निधालेल्या मोर्चातील पत्रकारांनी महामार्गाकडून पेण शहरात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच रास्ता रोको केल्याने पोलिसांनी पत्रकारांना ताब्यात घेतले. नंतर त्यांची सुटका करण्यात आली. 


पत्रकार एस.एम.देशमुख यांनी आंदोलनाचा आमचा उद्धेश साध्य झाल्याने आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. महामार्गाचे काम 1 जानेवारीपर्यत सुरू झाले नाही तर अधिक तीव्र आंदोलन केले जाईल आणि या आंदोलनात महाराष्ट्रातील पत्रकार सहभागी होतील असा इशारा दिला आहे. आंदोलनाची पुढील दिशा 11 जानेवारी रोजी रेवदंडा येथे होणा़ऱ्या सभेत नक्की केली जाणार आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचीही भेट घेतली जाणार आहे असे देशमुख यांनी सांगितले. 

मोर्चामध्ये मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष किरण नाईक, सरचिटणीस संतोष पवार, उपाध्यक्ष सुभाष भारव्दाज, प्रसिध्दी प्रमुख श्रीराम कुमठेकर , कोकण विभागीय चिटणीस मिलिंद अष्टीवकर, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पवार, माजी अध्यक्ष अभय आपटे, कार्यध्यक्ष संतोष पेऱणे, सरचिटणीस भारत रांजनकर, पेण प्रेस कल्बचे अध्यक्ष दत्ता म्हात्रे, विजय मोकल, देवा पेरवी पुणे पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुनील वाळुंज यांच्यासह अनेक पत्रकार सहभागी झाले होते.