Wednesday 24 December 2014

अहमदनगर प्रेस क्लबचे पुरस्कार जाहीर

अहमदनगर प्रेस क्लब आयोजित अजीजभाई चष्मावाला पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सहा जानेवारी या पत्रकार दिनाच्या दिवशी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यावर्षीचे पुरस्कार भूषण देशमुख, महेश देशपांडे, राजेंद्र झोंड, सुधीर लंके, मुरलीधर कराळे, शिल्पा रसाळ, रमेश देशपांडे, इकबाल शेख, समीर मन्यार या पत्रकारांना जाहीर झाले आहेत. पाच हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, शाल श्रीफळ असे पुरस्कारचे स्वरूप आहे.