Thursday 18 December 2014

पत्रकार संजय पिसाळ यांच्या कुटुंबियांना मदतीसाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा

सातारा - जिल्हयात उत्तर कोरेगाव या कायम दुष्काळी पट्टयात पुढारीसह विविध दैनिकांसाठी काम कऱणारे पत्रकार संजय प्रभाकर पिसाळ यांनी मागच्या आठवडयात आत्महत्या केली आहे.संजय पिसाळ किडनीच्या आजाराने त्रस्त होते.त्याना त्यांच्या मावशीनं किडनी दिली आणि पत्रकार मित्रांनी मदत निधी उभा करून ते ऑपरेशनही केलं. मात्र तरीही संजयचा त्रास काही कमी होत नव्हता.त्यासाठीचा दररोजचा होणारा खर्चही त्याना परवडणारा नव्हता.प्रत्येकवेळी मित्रांची मदत घेणेही त्याच्या स्वाभिमानी मनााला पटणारे नव्हते.जेमतेम उत्पन्न असलेल्या संजयनं अखेर आत्महत्या करून आपले जीवन संपविले. पत्रकारांसाठी असलेली शासनाची कोणतीही योजना संजय पर्यत पोहोचलीच नाही.


संजय गेल्यानं त्याच्यावर अवलंबून असलेलं त्याचं कुटुंबं आज उघड्यावर पडलं आहे.ही गोष्ट सा़तारा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या प्रत्येक सदस्याला अस्वस्थ कऱणारी होती.त्यामुळे साताऱ्यातील पत्रकारांनी निर्धार करून संजयच्या कुटुंबाला आधार देण्याचा, संजूचं विस्कटलेलं घरटं पुन्हा बसविण्याचा निर्धाऱ केला आहे.त्याचाच एक भाग म्हणून सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संवेदनशील अध्यक्ष हरिष पाटणे यांनी आजचा आपला वाढदिवसही रद्द करून त्यासाठी होणाऱ्या खर्चातून संजयच्या कुटुंबाला मदत करायची असा स्वागतार्ह निर्णय़ घेतला आहे. संजयच्या कुटुंबाला कोणी मदत करू इच्छित असेल तर आपला डीडी किंवा चेक स्नेहा पिसाळ ( संजय पिसाळ यांची मुलगी ) च्या नावानं काढून तो हरिष पाटणे व्दारा पुढारी कार्यालय, सातारा या पत्त्यावर पाठवावा. 

अधिक माहितीसाठी हरिष पाटणे 8805007182 किंवा शरद काटकर 9823963377 या नंबरवर संपर्क साधता येईल.