Thursday 18 December 2014

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे पुरस्कारांसाठी आवाहन

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दर वर्षी ६ जानेवारीला पत्रकार दिन समारंभ आयोजित करण्यात येतो. या समारंभात पत्रकारीतेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विविध पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांसाठी आपल्या विविध लेखांच्या प्रतींची फाईल किंवा पुस्तकांच्या प्रती किंवा इलेक्ट्रोनिक मिडियातील पत्रकारांनी त्यांच्या स्टोरीची क्लिपिंग पत्रकार संघात शनिवार दिनांक २० डिसेंबर २०१४ पर्यंत पाठवाव्यात असे आवाहन पत्रकार संघ द्वारे करण्यात आले आहे. 

पुरस्कारांची माहिती….  
१. आप्पा पेंडसे पुरस्कार : पुरस्काराचे स्वरूप : स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुछ.
निकष बृहन्मुंबईतील नागरी समस्यांवरील गेल्या वर्षभरातील उत्कृष्ट वृतांत, स्तंभ व लिखाण यासाठी दिला जाणारा पुरस्कार.
२. जयहिंद प्रकाशन पुरस्कार : पुरस्काराचे स्वरूप : स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुछ.
निकष : पत्रकारितेला उपयुक्त ठरणा-या विषयावर (उदा. सामाजिक, आर्थिक, पर्यावरण आदी) लेखन लिहिणा-या लेखकाचे चालू सालातील उत्कृष्ट पुस्तक. यामध्ये ललित साहित्य किंवा कथासंग्रहाचा विचार केला जाणार नाही.
३. कॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार : पुरस्काराचे स्वरूप : स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ
निकष : कामगार, झोपडपट्टी, भाडेकरू, घर दुरुस्ती व दलितोद्धार या विषयांवरील लिखाणाबद्दल दिला जाणारा पुरस्कार.
४. विद्याधर गोखले : ललित लेखन पुरस्कार : पुरस्काराचे स्वरूप : स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुछ.
निकष : पत्रकाराने केलेल्या ललित लेखनासाठी दिला जाणारा पुरस्कार.
५. रमेश भोगटे पुरस्कार : पुरस्काराचे स्वरूप : स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुछ.
निकष : उत्कृष्ट राजकीय बातम्यांबद्दल दिला जाणारा पुरस्कार.