Wednesday 31 December 2014

पत्रकार संघाने पत्रकारांचे लिंगच बदलले

मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये सध्या दुफळी माजली असून याचा परिणाम पत्रकार संघाच्या कार्यक्रमावर दिसू लागला आहे. पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचे कामकाजाकडे लक्षच नसल्याने पत्रकार दिना निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर पुरस्कार प्राप्त महिला पत्रकारांचे लिंगच बदलण्याचे काम पत्रकार संघाकडून झाले आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघाकडून ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमानिमित्त पत्रकारांना पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी पत्रकार संघाने निमंत्रण पत्रिका छापून घेतल्या आहेत. निमंत्रण पत्रिकेमध्ये पुरस्कार प्राप्त पत्रकारांमध्ये जय महाराष्ट्र वृत्त वाहिनीच्या सुषमा परतवाघ व इंडियन एक्सप्रेसच्या शुभांगी खापरे या दोघी महिला पत्रकार असताना यांच्या नावा समोर श्री असे प्रसिद्ध करून स्त्रीला पुरुष केले आहे. 

कार्यक्रम पत्रिका प्रिंटींगला देण्या आधीच योग्य रित्या डीटीपीची तपासणी करणे गरजेचे असते. पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यानी स्वतः  डीटीपीची तपासणी करणे गरजेचे असताना कर्मचाऱ्यांवर हि जबाबदारी ढकलल्याने असा प्रकार झाला आहे. सदर कार्यक्रमाची पत्रिका पदाधिकार्यांनी प्रिंटींगला देण्या आधी योग्य रित्या तपासली असती तर छपाईचा खर्च फुकट गेला नसता. कार्यक्रम पत्रिकेमध्ये चुका झाल्याने पुन्हा नवीन पत्रिका छपाई करण्याची नामुष्की पत्रकार संघावर आली आहे. या चुकीसाठी एखाद्या कर्मचाऱ्याला बळीचा बकरा बनवला जाण्याची शक्यता आहे. वृत्तपत्रात काम करणाऱ्या आणि प्रत्तेक अक्षर तपासून बघणाऱ्या वृत्तपत्रातील पत्रकारांच्या संघटनेकडूनच अशी चूक झाल्याने उलट सुलट चर्चा सुरु आहे.