Thursday 1 January 2015

नव जागृती (मराठी) न्यूज चॅनलचे बुलेटिन सुरू...

स्वत:ला नामवंत, ग्रेट समजणाऱ्या आणि पॅकेज मागणा-या प्रस्थापितांना न घेता होतकरू, गुणवंत आणि कष्टाळू यंग ब्रिगेड घेवून जागृतीचे चेअरमन राज गायकवाड,व्हॉईस चेअरमन राहूल भार्गव, मुख्य संपादक संजीव शाळगावकर यांनी नव जागृती (मराठी) न्यूज चॅनल सुरू केले आहे. 

या न्यूज चॅनल मध्ये विशेष करून ग्रामीण भागावर लक्ष देण्यात आले आहे. बातम्यांचे सादरीकरण उत्तम असून भविष्यात प्रस्थापित चॅनलला टक्कर देण्याची क्षमता या चॅनल मध्ये आहे. सध्या या चॅनलचे ट्रायल सुरू असून, नितीन गडकरी यांच्या हस्ते लवकरच भव्य शुभारंभ होणार आहे. सदर चॅनल Dish Tv वर क्रमांक 879 वर दिसत आहे. लवकरच ऑल DTH आणि केबलवर दिसणार आहे.