Wednesday 11 February 2015

पत्रकारांसाठी कार्यशाळेचे ( रिफ्रेशिंग कोर्सचे ) आयोजन

नव्या तंत्रज्ञानाच्या गतिमानतेमुळे प्रसारमाध्यमांच्या कार्यपद्धतीत कमालीचा बदल झाला आहे. प्रिंट आणि इलेक्ट्रोनिक माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांना वैशिष्ट्यपूर्ण काम करण्याबरोबरच अपडेट राहणे अपरिहार्य झाले आहे. बदलत्या परिस्थितीत पत्रकारांना अपडेट राहता यावे म्हणून 'मिडिया फॉर पिपल' आणि 'साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक' यांच्या संयुक्त विद्यमाने १४ व १५ फेब्रुवारी २०१५ रोजी आंतरभारती भवन, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, वडघर, तालुका माणगाव, जिल्हा रायगड येथे पत्रकारांसाठी कार्यशाळेचे (रिफ्रेशिंग कोर्स) आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेत माध्यमांचे बदलते स्वरूप, पत्रकारिता ग्रामीण / शहरी, पत्रकारितेतील विविधांग, समाज समजून घेताना या विषयांवर पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद होणार आहे. प्रसार माध्यमातील पत्रकारांना भेडसावणाऱ्या ताणतणावाबाबत मानसोपचार तज्ञांशी संवाद तसेच केस स्टडी होणार आहे.

कार्यशाळेचे उद्घाटन सत्र राजीव खांडेकर तर समारोप सत्र निखिल वागळे घेणार आहेत. याशिवाय जेष्ठ पत्रकार निळू दामले, जयदेव डोळे आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.तरी पत्रकार कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पत्रकारांनी अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी खालील पदाधिकारयांकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

अध्यक्ष युवराज मोहिते ९८६९०७८९७७
कार्याध्यक्ष सुरेश कराळे ९८६९४३९६८०
सुरेंद्र गांगण (हिंदुस्तान टाईम्स) ९८२१९११२००
शशिकांत सांडभोर (जागृती टीव्ही) ९८६९१३२५९५