Tuesday 17 February 2015

‘आमचं विद्यापीठ’ कि दर्डांची 'टिमकी' ?

‘लोकमत’मधील चाकरमाने पत्रकार अतुल कुळकर्णी संपादित ‘आमचं विद्यापीठ’ हे पुस्तक व्यक्तीस्तोम आणि मस्काबाजीचे बटबटीत उदाहरण आहे! यातील विद्यापीठ म्हणजे ‘लोकमत’च्या मालकांपैकी एक असलेले राजेंद्र दर्डा आहेत. त्यांनी लोकमत हे वृत्तपत्र या भागात अतिशय उत्तमपणे संघटित केले असले आणि त्यांच्यातील व्यवस्थापकीय कौशल्याबद्दल दुमत नसले तरीही ‘पत्रकारितेचे विद्यापीठ’ हा त्यांचा या पुस्तकातील लेखक आणि संपादकांकडून करण्यात आलेला गौरव पूर्णपणे अनाठायी, अप्रस्तुत आणि मराठी पत्रकारितेतील मान्यवरांचा उपमर्द करणारा आहे.

राजेंद्र दर्डा विद्यापीठ असतील तर आचार्य अत्रे , गं.त्र्यं. माडखोलकर, अनंत गोपाळ शेवडे , ह. रा. महाजनी , द्वा. भ. कर्णिक , विद्याधर गोखले , माधव गडकरी, अनंतराव भालेराव , रंगा वैद्य , गोविंदराव तळवलकर , दि.भा.घुमरे , पा.वा. गाडगीळ , बाबा दळवी, मा. गो. वैद्य, कुमार केतकर, अरुण टिकेकर हे पत्रकारितेच्या क्षेत्रातील काय ‘प्राथमिक शाळा’ होत्या काय? हेही जाऊ द्या, ज्यांच्या नावाचा जप सातत्याने करत लोकमत चालवले जाते ते ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलाल दर्डा हे काय राजेंद्र दर्डा नावाच्या विद्यापीठाचे विद्यार्थी होते काय? एखाद्यात असलेल्या आणि नसलेल्या गुणांची घसा कोरडा पडेपर्यंत टिमकी वाजवणे म्हणजे लाचारीचा कळसच आहे. खरे तर या पुस्तकाचे नाव ‘टिमकी’ असे असायला हवे होते!

सतीश कुलकर्णी
९१५८३५०९९९

https://www.facebook.com/satish.kulkarni.14418 मधून साभार