Thursday 19 February 2015

रायगड प्रेस क्लबच्या पुरस्कारांची घोषणा

रायगड प्रेस क्लबच्या सन २०१५ च्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून आचार्य अत्रे  राज्यस्तरिय युवा संपादक पुरस्कार मंदार फणसे यांना तर राजन वेलकर यांना स्व. प्रकाश काटदरे निर्भिड पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे.

आचार्य अत्रे राज्यस्तरिय युवा संपादक पुरस्कार मंदार फणसे ( कार्यकारी संपादक, IBN Lokmat )
ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार प्रमोद वालेकर (संपादक, किल्ले रायगड), युवा पत्रकार पुरस्कार अल्ताफ चोरडेकर- रोहा ( दैनिक पुढारी) , दिलीप आंबावले- महाड( दैनिक सामना) , महिला पत्रकार पुरस्कार संतोषी म्हात्रे- खोपोली( दैनिक कृषीवल), उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार महेंद्र खैरे- रेवदंडा (दैनिक रत्नागिरी टाईम्स) , विशेष पुरस्कार वामन पाटील, अलिबाग नागेश कुलकर्णी, अलिबाग, तर स्व.प्रकाश काटदरे निर्भिड पत्रकार पुरस्कार राजन वेलकर ( संपादक, दैनिक रायगड टाईम्स) यांना जाहीर झाले आहे.