Sunday 10 May 2015

आप करणार प्रसारमाध्यमांवर कारवाई

नवी दिल्ली - मुख्यमंत्री किंवा सरकारची प्रतिमा मलिन करणारी कोणती बातमी तुमच्या निदर्शनास आली तर, तुम्ही प्रधान सचिवांकडे तक्रार दाखल करा असे निर्देश दिल्लीतल्या आप सरकारने आपल्या अधिका-यांना दिले आहेत.  

दिल्ली सरकारशी संबंधित अधिका-यांच्या वाचनात सरकारची प्रतिमा मलिन करणारी एखादी बातमी आली किंवा, वृत्तवाहिनीवर अशी बातमी सुरु असेल तर तुम्ही प्रधान सचिवांकडे तक्रार दाखल करु शकता. माहिती आणि प्रसिध्दी विभागाच्या संचालनालयाने यासंबंधीचे परिपत्रक काढून तसे निर्देश दिले आहेत.
बदनामी करणारी अशी बातमी निदर्शनास आल्यानंतर तक्रार करताना गृह विभागाच्या प्रधान सचिवांना पत्राव्दारे त्या बातमीबद्दल संपूर्ण माहिती द्यावी लागणार आहे. बातमीतील चूकीची माहिती, आरोप याचे सविस्तर विश्लेषण करावे लागेल. गृहविभागाचे प्रधान सचिव संपूर्ण तक्रारीतील मुद्दे तपासतील त्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी कायदे विभागाचा सल्ला घेतला जाणार आहे.