Monday 25 May 2015

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकारांना आवाहन

मुंबई - ‘मुंबई मराठी पत्रकार संघा’च्या वतीने वर्धापनदिनी पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा गौरव करण्याच्या दृष्टीने विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. ‘पद्मश्री यमुनाताई खाडिलकर पुरस्कार’ हा शोधपत्रकारितेसाठी दिला जाणारा पुरस्कार आहे. गेल्या वर्षभरातील वैशिष्टय़पूर्ण प्रकरणे उजेडात आणण्याविषयी केलेल्या बातमीला हा पुरस्कार देण्यात येतो.

(बातमीचे कात्रण जोडणे आवश्यक) ‘कविवर्य भालचंद्र खांडेकर स्मृती पुरस्कार’ वृत्तपत्रात काम केलेल्या ज्येष्ठ मुद्रितशोधकास हा पुरस्कार दिला जातो. (मुद्रितशोधकाचे नाव आणि काम केलेल्या कालावधीविषयी माहिती) ‘अनंत हरी गद्रे पुरस्कार’ सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून पत्रकारिता क्षेत्रात प्रदीर्घ कार्य केल्याबद्दल दिला जातो.
(पत्रकाराचे नाव आणि सामाजिक बांधिलकीतून केलेल्या पत्रकारितेची थोडक्यात माहिती) . अधिक शिरोडकर पुरस्कृत तोलाराम कुकरेजा वृत्तछायाचित्र पुरस्कार’ वृत्तछायाचित्रकार म्हणून प्रदीर्घ कामागिरीबद्दल दिला जातो (छायाचित्रकाराचे नाव आणि सेवेच्या कालावधिविषयी). आवश्यक माहिती ३० मेपर्यंत ‘मुंबई मराठी पत्रकार संघा’च्या कार्यालयात पाठवावी.
दैनिक प्रहार मधून साभार