Thursday 16 July 2015

मंत्रालय आणि विधिमंडळातील पत्रकारांना आवाहन

मंत्रालय आणि विधिमंडळाचे वृत्तसंकलन करणाऱ्या वृत्तपत्र, वृत्तवाहिनी, वृत्तसंस्थांचे, साप्ताहिकांचे अधिस्विकृतीधारक व इतर पत्रकार, छायाचित्रकार, क्यामेरामन यांनी नोंदणीकृत "मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ" या संघटनेचे सभासदत्व स्वीकारावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

मंत्रालय आणि विधिमंडळाचे वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांना त्यांचे न्याय व हक्क मिळवून देणारी कोणतीही नोंदणीकृत संघटना अस्तित्वात आली नसल्याने "मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ" नोंदणीकृत करण्यात आला आहे. सदर संघ "जर्नलिस्ट्स युनियन ऑफ महाराष्ट्र" या कामगार कायद्याखाली नोंद असलेल्या पत्रकार संघटनेशी संलग्न करण्यात आला आहे. यापुढे मंत्रालय आणि विधिमंडळाचे वृत्तसंकलन करणाऱ्या सर्व पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सदर संघ कार्यरत राहणार असून बीट वरील सर्वच अधिस्विकृतीधारक व इतर पत्रकार, छायाचित्रकार, क्यामेरामन यांना संघटनेचे सभासदत्व दिले जाणार आहे. 

तरी मंत्रालय तसेच विधिमंडळाचे वृत्तसंकलन करणाऱ्या सर्व अधिस्विकृतीधारक व इतर सर्वच पत्रकार, छायाचित्रकार, क्यामेरामन यांनी नोंदणीकृत संघटनेचे सभासद व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे. "मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघा"चे सदस्य होण्यासाठी संघाचे अध्यक्ष अजेयकुमार जाधव (मो.- 9969191363) व सरचिटणीस नागेश दाचेवार (मो.- 9270333886 ) यांच्याशी संपर्क साधावा.