Monday 12 October 2015

पत्रकार इंगळे हल्ला प्रकरणी तिघांना अटक

आयबीएन लोकमत वृत्तवाहिनीचे पत्रकार जीत इंगळे आणि त्यांच्या दोन भावांवर प्राणघातक हल्ला झाला या प्रकरणी शेट्टी अन्ना उर्फ़ शेलवम, नॉनी उर्फ़ सागर कोरेगावकर आणि संतोष सोनवणे यांना अटक करण्यात आली असून या तिघांना मंगळवारी वसईच्या न्यायालयात हजार केले जाणार आहे. 

द प्रेस क्लब वसई विरारचे पदाधिकारी आणि आयबीएन लोकमत वृत्तवाहिनीचे पत्रकार जीत इंगळे आणि त्यांच्यादोन भावांवर प्राणघातक हल्ला झाला आहे. या हल्ल्याचा क्राइम रिपोर्टर्स वेलफेयर एसोसिएशनने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. इंगळे यांच्या परिवारावार झालेल्या हल्ल्यमुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. बेकायदेशीर कायदे धाब्यावर बसवून काम करणारे आणि संविधानाच्या नियमाचे उल्लंघन कारणाऱ्यांच्या विरोधात आवाज उचलने एक गुन्हा ठरत आहे. कधी कधी तर लिहण्याची आणि बोलण्याची स्वातंत्र्यता फ़क्त छळवणूक करण्यासाठी आहे असे वाटते असे क्राइम रिपोर्टर्स वेलफेयर एसोसिएशनने म्हटले आहे. जीत इंगळे व त्यांच्या कुटुंबीयांवार हल्ला करणाऱ्याना त्वरित अटक करावी अन्यथा क्राइम रिपोर्टर्स वेलफेयर एसोसिएशन आपल्या पद्धतीने आंदोलन करेल असा इशारा दिला आहे.