Wednesday 14 October 2015

"बेरक्या मिडिया न्यूज" ऐवजी "प्रेस मिडिया न्यूज" हा नवीन ब्लॉग सुरु


"बेरक्या मिडिया न्यूज" ( http://berakya.blogspot.in ) हा ब्लॉग सुरु झाल्यापासून भल्याभल्या वृत्तपत्रांची / पत्रकारांची चुकीची कामे उघड केली आहेत. यामुळे कित्तेकांचे धाबे दणाणले आहेत. "बेरक्या उर्फ नारद" हा ब्लॉग आधी पासून सुरु आहे. आमचाही ब्लॉग बेरक्या या नावाने सुरु असला तरी या ब्लॉगचे नाव "बेरक्या मिडिया न्यूज" असे आहे.

बेरक्या या एकाच नावाच्या सुरुवातीने दोन ब्लॉग असल्याने वाचकांमध्ये नेमकी कोणती पोस्ट कोणत्या बेरक्याच्या ब्लॉगवर पडली याबाबत संभ्रम निर्माण होत आहे असे काही वाचकांनी आम्हाला कळविले आहे. "बेरक्या मिडिया न्यूज" या ब्लॉगचे नाव बदलावे असेही वाचकांनी सुचविले आहे. वाचकांसाठी आमचा ब्लॉग चालवला जात असल्याने वाचकांच्या सल्ल्याचा योग्य आदर ठेवला जात आहे.

आम्ही आमच्या नावा पेक्षा कामाला जास्त महत्व देतो. यामुळे "बेरक्या मिडिया न्यूज" या नावाने चाललेला ब्लॉग बंद करत असलो तरी या ब्लॉग वरील जुन्या प्रसिद्ध झालेल्या बातम्या वाचकांना वाचता याव्यात म्हणून हा ब्लॉग तसाच ऑनलाईन सुरु राहणार आहे. "बेरक्या मिडिया न्यूज" ऐवजी "प्रेस मिडिया न्यूज" हा नवीन ब्लॉग सुरु करण्यात आला आहे.

"प्रेस मिडिया न्यूज" या नवीन ब्लॉगवर वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, पत्रकार, पत्रकार संघटना यांच्या घडामोडीची माहिती असणार आहे. आमच्या वाचकांना आवडणाऱ्या अश्या वाचनीय बातम्या "प्रेस मिडिया न्यूज" या ब्लॉगवर असतील. आपण ज्या प्रमाणे "बेरक्या मिडिया न्यूज" या ब्लॉगला सहकार्य केले तसेच सहकार्य "प्रेस मिडिया न्यूज" या ब्लॉगलाही करावे हि अपेक्षा.

"प्रेस मिडिया न्यूज" या ब्लॉगला भेट देण्यासाठी http://pressmedianews.blogspot.in या लिंकला भेट द्या.

मटक्‍याचे आकडे छापणाऱ्या दैनिक "पुढारी‘ आणि "तरुण भारत‘वर गुन्हा दाखल

गोव्यात मटक्‍याचा धंदा जोरात सुरु आहे. मटक्याचा धंदा चालवणारे आपला धंदा आणखी जोरात चालवा म्हणून वृत्तपत्रातून जाहिराती देत असतात. अश्या जाहिराती प्रसिद्ध करणाऱ्या दैनिक "पुढारी‘ आणि "तरुण भारत‘ या वृत्तपत्रांवर गोवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या या कारवाई मुळे बेकायादेशीर कामे करणाऱ्यांना वृत्तपत्रांचीही साथ असल्याचे उघड झाले आहे. वृत्तपत्रांसह काही मटका ऑपरेटर तसेच एक अनोळखी मंत्री, काही राजकारणी, पोलिस अधिकाऱ्यांवरही उच्च न्यायलयाच्या पणजी खंडपीठाच्या आदेशानुसार गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणी पोलिस तपास सुरु झाला असून संबंधित वृत्तपत्रांच्या व्यवस्थापनांकडेही चौकशी होईल असे या प्रकरणाचा तपास करणारे गुन्हा अन्वेषण विभागाचे निरिक्षक विश्‍वेश कर्पे यांनी सांगितले.  

Monday 12 October 2015

पत्रकार इंगळे हल्ला प्रकरणी तिघांना अटक

आयबीएन लोकमत वृत्तवाहिनीचे पत्रकार जीत इंगळे आणि त्यांच्या दोन भावांवर प्राणघातक हल्ला झाला या प्रकरणी शेट्टी अन्ना उर्फ़ शेलवम, नॉनी उर्फ़ सागर कोरेगावकर आणि संतोष सोनवणे यांना अटक करण्यात आली असून या तिघांना मंगळवारी वसईच्या न्यायालयात हजार केले जाणार आहे. 

पोलीस निरीक्षकाकडून पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी

मावळातील वाढती गुन्हेगारी व अवैध धंद्‌याच्या बातम्या सतत प्रसिध्द करणा-या तसेच कामशेतसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या निर्मीतीसाठी सतत पाठपुरावा करणा-या पत्रकारांना वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय जाधव व पोलीस हवालदार बाबा शिंदे यांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती मावळ पत्रकार संघातर्फे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

पनवेलमध्ये पत्रकाराला मारहाण

पनवेल: पनवेल येथील दैनिक कर्नाळा या दैनिकाच्या पत्रकाराला मारहाण करण्याचा प्रकार पनवेल तालुक्यातील शिरढोण गावात घडला आहे.शनिवारी रात्री १० च्या सुमारास शिरढोण गावातील तीन युवकांनी योगेश मुकादम या २६ वर्षीय पत्रकाराला मारहाण केली.व जीवे मारण्याची धमकी दिली.वर्तमान पत्रात बातमी दिल्याचा राग मनात ठेऊन या तिघांनी योगेश मुकादम यास मारहाण केली.