Thursday 5 March 2015

भाजपाच्या माजी सभापती व दोन मुलांनी पत्रकाराच्या कुटुंबावर केला प्राणघातक हल्ला

सुरेश काटे गेल्या  दहा वर्षा पासून पत्रकार या क्षेत्रात  कार्यरत  आहे. काटे यांनी कल्याण डोंबिवली या भागात सहा सात वर्षां पासून विविध वृत्तवाहिनीत काम केले आहे. कल्याण डोंबिवली मधील अनेक अनेक प्रकारणे काटे यांनी उघड केली आहे. त्या बातम्यांचा परिणाम पोलिसांनवर खूप मोठ्या प्रमाणात झाला. या कामाची खून्नस पोलिसांनी काटे यांच्या नातेवाईकांना हाताशी धरून कौटुंबिक वादाचे स्वरूप देवून 2013 साली 354 या खोट्या आरोपात काटे यांच्यावर गुन्हा दाखल केला.पुन्हा पैशाच्या जोरावर आमच्या फॅमिलीवर 27 फेब्रुवारी 2015 ला 498 हा गुन्हा  काहीही  चौकशी न करता  दाखल केला.  

संबंधित व्यक्ति  हे करूनही  थांबले  नाहीत  तर त्यांनी 4 मार्च  2015  ला डोंबिवलीतील काटे यांच्या राहत्या  घरी येऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण सुदैवाने काटे हे कल्याण येथे कामावर गेले होते. मारेकरयांना काटे घरात भेटले नाही म्हणून त्यांनी  त्यांच्या पत्नीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न  केला. तिचा विनयभंग केला. अंगावरचे  कपडे फाडले याबाबत डोंबिवली येथील  मानपाडा  पोलिस  ठाण्यात ipc  308,452.427,354,34. प्रमाणे  गुन्हा दाखल केला आहे. हे मारेकरी  उल्हासनगर  महापालिका  येथे माजी स्थायी समिति सभापति रामदास उमाप (bjp) जयप्रकाश  उमाप व विजय उमाप हे कल्याण डोंबिवली  व उल्हासनगर महापालिका येथील ठेकेदार आहेत. हे आरोपी पैशाच्या जोरावर काहीही करू शकतात यामुळे काटे यांनी मदतीची अपेक्षा केली आहे