Thursday 24 July 2014

दिवंगत पत्रकाराच्या कुटुंबाला मदतीसाठी पत्रकारांचा मदतीचा हात

कोकणातील रत्नागिरी येथील जेष्ठ पत्रकार दत्ता मुकुंद सावंत यांचे निधन झाले आहे. सावंत यांनी अगदी निष्ठेने पत्रकारिता केली आहे. यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेलीच राहून त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर आले आहे. मात्र कोकणातील पत्रकारांनी सावंत यांच्या पाठीशी उभे राहत मदतीचा हात पुढे केला आहे. कित्तेक पत्रकारांनी आप आपल्या ऐपती प्रमाणे सावंत यांच्या कुटुंबीयांनी मदत केली आहे. महाराष्ट्रातील पत्रकारांना इतर राज्या प्रमाणे पेन्शन योजना लागू नाही. पत्रकारांना त्यांचे मालक चांगला पगार देतात अशी परिस्थितीही नाही असे असताना कोकणातील पत्रकारांनी दिवंगत पत्रकाराच्या कुटुंबियाला जो मदतीचा हात दिला आहे त्या सर्व पत्रकारांना बेरक्याचा सलाम.