Tuesday 26 August 2014

पालिकेतील पत्रकार निघाले फुकटच्या दारू आणि मटणाच्या पार्टीला......

मुंबई महापालिकेद्वारे दर वर्षी मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणे कशी भरली आहेत हे पत्रकारांना दाखवण्यासाठी एक दौरा आयोजित केला जातो. पत्रकारांना खुश करण्यासाठी अभ्यास आणि पाहणी दौरा असे नामकरण करून काढल्या जाणाऱ्या या दौर्यामध्ये पत्रकारांना दारू आणि मटणाच्या पार्टी देवून खुश करण्याचा प्रयत्न केला जातो. मुंबईकर नागरिकांच्या कर रूपामधून जमलेल्या निधीमधून आयोजित केल्या जाणाऱ्या दौऱ्यामध्ये स्थायी समिती अध्यक्ष, सदस्य, महापौर, पत्रकार, आणि जनसंपर्क विभागातील अधिकारी कर्मचारी सहभागी असतात. 

पालिकेच्या जनसंपर्क विभागाकडून या दौऱ्याला अभ्यास आणि पाहणी दौरा बोलले जात असले तरी या दौऱ्यामध्ये पत्रकारांना खुश करण्यासाठी दारूचा पूर वाहत असतो. पत्रकारही या दौऱ्यामध्ये श्रावण संपल्यामुळे फुकटची हवी तेवढी दारू ढोसायला मिळते आणि मटणावर ताव मारायला मिळतो म्हणून दरवर्षी मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात. असाच पालिकेचा दौरा बुधवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी आयोजित केला गेला होता. परंतू महापौर सुनील प्रभू यांनी सांगितल्या नुसार हा दौरा आता गुरुवारी २८ ऑगस्टला आयोजित करण्यात आला आहे. 

२८ ऑगस्टला हमखास आचारसंहिता लागणार असल्याची माहिती महापौर सुनील प्रभू यांना मिळाली असल्याने याच दिवशी सकाळीच दौरा काढण्याचे फर्मान प्रभू यांनी काढले आहे. दौरा निघाल्यावर नंतर आचारसंहिता लागली तरी काही फरक पडणार नाही असा समज महापौरांनी करून घेतला आहे. दुपारी स्थायी समिती अध्यक्षांच्या नावाने दारू पाजून पत्रकारांना खुश करण्याचा तर महापौरांचा शेवटचा दौरा म्हणून रात्री पत्रकारांना दारू पाजून खुश करण्याचा बेत आखण्यात आला आहे. 

बुधवारी मटण आणि दारूवर हवा तास ताव मारता येणार म्हणून भलतेच खुश झालेल्या पत्रकारांना अचानक महापौरांनी बुधवार ऐवजी गुरुवारी दौरा आयोजित करण्याचे फर्मान काढल्याने चांगलाच धक्का बसला असून गुरुवारी आता दारू पियायाची कशी आणि मटण खायचे कसे असे कित्तेक प्रश्न काही पत्रकारांना पडले आहेत. 

तर आपण नेहमी पिणारे खाणारे पत्रकार आहोत. प्रेस क्लब मध्ये अश्या फुकटच्या पार्ट्या आपण नेहमीच झोडतो.… सर्व पत्रकारांना पार्टी द्यायची आहे असे खोटे सांगून अधिकारी आणि राजकीय नेत्यांकडे भिक मागून पैसे जमवतो…… आणि महिन्यातून एक दोन वेळा तरी शनिवार रविवारी आपल्या "व्हाट्सअप" ग्रुप मधील पत्रकार मिळून पार्ट्या करतो….आपल्याला अश्या फुकटच्या पार्ट्यांची चांगलीच सवय सवय आहे…. यामुळे बुधवार काय किंवा गुरुवार काय आपल्याला सर्व सारखेच असल्याने आपण या दौऱ्याला नक्की जायचेच आणि दारू व मटणावर ताव मारायचा अशी चर्चा काही पत्रकारांमध्ये आहे.