Monday 12 January 2015

ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचा सत्कार

मुंबई : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार व एक लाख रुपये रोख देवून गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अँड़ रावसाहेब शिंदे होते. या वेळी आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे आदी उपस्थित होते.


अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने सहकार, साहित्य, समाजसेवा, पर्यावरण या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असणार्‍या व्यक्तींसाठी स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार व एक लाख रुपये रोख पुरस्कार स्वरुपात देण्यात येतात. भावे हे ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक आहेत. त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त १00 पेक्षा जास्त व्याख्याने दिली आहेत.